काही जण जेलमध्ये तर एकनाथ शिंदे हिमालयात निघून जातील; ठाकरेंच्या नेत्याच्या व्यक्तव्याने भुवया उंचावल्या

Sanjay Raut Statement On Shinde Faction Jail Himalaya Remark: शिर्डीतील मेळाव्यात संजय राऊत यांचा शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Sanjay Raut addresses Shiv Sena (UBT) workers at Shirdi, launching a sharp attack on BJP and the Shinde faction.
Sanjay Raut addresses Shiv Sena (UBT) workers at Shirdi, launching a sharp attack on BJP and the Shinde faction.saam tv
Published On

खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिर्डीत शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा संपन्न झाला. माजी खासदार चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे हे देखील मेळाव्यासाठी उपस्थित होते. या मेळाव्यातून पक्षवाढीसह SIR बाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. शिर्डीचे ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे मात्र मेळाव्यासाठी अनुपस्थित होते. खासदार संजय राऊत यांनी मेळाव्यातून भाजप आणि शिंदे गटासह राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केलीये.

Sanjay Raut addresses Shiv Sena (UBT) workers at Shirdi, launching a sharp attack on BJP and the Shinde faction.
Kalyan Crime: कल्याणमध्ये वाहतूक पोलिसावर हल्ला, २ तरुणांकडून रक्त येईपर्यंत बेदम मारहाण

राऊत म्हणाले, काल पर्यंत उबाठा संपेल असे म्हणणारे विखे पाटील स्वतःच अडचणीत सापडतील. ज्या उबाठाने तुम्हाला आणि तुमच्या वडिलांना मंत्रीपद दिले त्याच पक्षावर टीका करणे हे कृतघ्नपणाचे लक्षण आहे. तुम्ही अनेक पक्षांतर करत शेवटी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता निष्ठेचे धडे देत आहेत. राऊत पुढे म्हणाले, काँग्रेसने विखे पाटील यांना मोठे केले आणि पण आज तेच भाजपच्या पालख्या वाहत आहेत, अशा लोकांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये, वाईट काळ हा सर्वांवर येतो. उद्या तुमचाही वाईट काळ सर्वांवर येतो, उद्या तुमचाही वाईट काळ येईल, तेव्हा काहीजण जेलमध्ये जातील आणि काहीजण हिमालयात निघून जातील

Sanjay Raut addresses Shiv Sena (UBT) workers at Shirdi, launching a sharp attack on BJP and the Shinde faction.
Maharashtra Politics : महाराष्ट्राला मिळाले १० नवे आमदार, सर्व यादी एका क्लिकवर

शेवटी त्यांनी थेट इशारा देत म्हटलं, विखे पाटील, तुम्ही तुमचं लाचारीचं काम चालू ठेवा, पण शिवसेनेच्या नादी लागू नका. अन्यथा मला स्वतः इथे येऊन बसावं लागेल. असा जोरदार हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. या भाषणामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून आगामी काळात शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजप यांच्यातील वाद अधिक वाढण्याची शक्यता असून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यावर काय प्रतिक्रिया देता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com