Ind Vs Pak: भारत–पाक सामना ठरला राजकीय रणांगण; संजय राऊत विरुद्ध अजित पवार आणि शिंदेसेनेची जुंपली

Maharashtra Politics Heats Up Over India–Pakistan Cricket Match: भारत आणि पाकिस्तानमधल्या क्रिकेट सामन्यावरुन जोरदार राजकारण तापलंय. काही ठिकाणी तीव्र पडसाद उमटलेत. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय.
Thackeray Sena workers protest against India–Pakistan cricket match as Sanjay Raut slams Ajit Pawar and Shinde Sena in a heated political battle.
Thackeray Sena workers protest against India–Pakistan cricket match as Sanjay Raut slams Ajit Pawar and Shinde Sena in a heated political battle.Saam Tv
Published On

संजय राऊतांच्या या आक्रमक भूमिकेला कारण ठरलयं..भारत- पाकिस्तान सामना.. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील क्रिकेट सामना रद्द होण्याची चर्चा सुरु होती. मात्र या सामन्याला ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर ठाकरेसेनेनं आक्रमक पवित्रा घेतलाय. 14 सप्टेंबरला होणाऱ्या या मॅचविरोधात ठाकरेसेनेनं राज्यात 'माझा देश माझा कुंकू' हे आंदोलन सुरु केलंय... त्यातच अजित पवारांच्या एका विधानामुळे संजय राऊतांनी त्यांच्यावर जहाल टीका केलीय...

इतकचं काय तर राऊतांनी भारत-पाकिस्तान सामन्यावरून एकनाथ शिंदेंवरही कठोर शब्दात टीका केली...त्यामुळे शिंदेसेनाही आक्रमक झालीय...

दरम्यान राऊतांनी केलेल्या टीकेनंतर अजित पवारांनी कुणी काय पाहावं याचा प्रत्येकाला अधिकार आहे, असा शब्दात पलटवार केला. तर उद्योगमंत्री उदय सामंतांनी राऊतांच्या बोलण्याला महत्त्व देण्याची गरज नाही, अशी टीका केली

भारत- पाक सामन्यावरुन राजकारण्यांचा खेळ सुरु आहे. राज्यातलं राजकीय वातावरण तापलेलं आहे. आगामी पालिका निवडणुका लक्षात घेता विरोधकांची या मुद्यावरुन सरकारविरोधात फटकेबाजी सुरुच राहणार आहे. आता सत्ताधारी याला कसे सामोरे जातात ते पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com