संजय राऊतांना कॅन्सर; ईडीच्या तुरुंगातूनच आजाराची सुरुवात, ठाकरेंच्या खासदाराचा धक्कादायक खुलासा

Sanjay Raut Cancer Revelation: संजय राऊत यांनी कोल्हापुरातील दिनमान साहित्य उत्सवातील मुलाखतीत कॅन्सरबाबत धक्कादायक खुलासा केला.
Sanjay Raut reveals cancer began during ED custody
Sanjay Raut reveals cancer began during ED custodysaam tv
Published On

रणजीत माजगांवकर, साम टीव्ही

कोल्हापूर: ईडीच्या तुरुंगातून बाहेर आल्यानंतर काही महिन्यांतच मी गंभीर आजारी पडलो. मला कॅन्सर झाला आणि या आजाराचे मूळ मी तुरुंगात असतानाच सुरू झाले, असा अत्यंत धक्कादायक खुलासा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. कोल्हापूर येथे आयोजित 'दिनमान साहित्य उत्सव पर्व २' मधील प्रकट मुलाखतीदरम्यान ते बोलत होते. जेष्ठ पत्रकार विजय चोरमारे आणि अमेय तिरोडकर यांनी ही मुलाखत घेतली.

माझी पत्रे राहुल गांधींपर्यंत पोहोचू दिली नाहीत

तपास यंत्रणांवर गंभीर आरोप करताना राऊत म्हणाले, "ईडी आणि सीबीआय या संस्थांसारखी दहशत निर्माण केली जात आहे. मला ईडीने का पकडले, माझी केस काय होती, हे मला आजही माहित नाही. ईडीच्या कोठडीत असताना मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि राहुल गांधी यांना पत्रे लिहिली होती. परंतु ती पत्रे त्यांच्यापर्यंत पोहोचूच दिली गेली नाहीत.

Sanjay Raut reveals cancer began during ED custody
'१७ सप्टेंबरनंतर देशात राजकीय भूकंप होणार'; मोदी-शाह यांच्याबाबत बड्या नेत्याचं धक्कादायक भाकीत

घरात सापडलेल्या १२ लाखांवर लिहिले होते एकनाथ शिंदेंचे नाव

अटकेच्या वेळचा एक किस्सा सांगताना राऊत म्हणाले, माझ्यावर रेड पडली तेव्हा घरात १२ लाख रुपये सापडले. आम्ही चार दिवसांपूर्वीच अयोध्येवरून आलो होतो. त्या पुडक्यावर 'उरलेली रक्कम एकनाथ शिंदे यांना द्यायची आहे' असे स्पष्ट लिहिले होते." अंगावर खादी असली तरी आम्ही बाळासाहेबांचे ओरिजनल गुंड आहोत, ईडी आज आहे उद्या नाही, अशी आक्रमक भूमिकाही त्यांनी मांडली.

Sanjay Raut reveals cancer began during ED custody
PM Modi : नरेंद्र मोदींच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी चूक; संजय राऊतांच्या विधानाने खळबळ, अमित शाहांवर डागली तोफ

मोदी आणि शाह यांची भूमिका अत्यंत घातक

पुढे बोलताना राऊत म्हणाले, देशाच्या राजकारणात फक्त 'मीच राहीन' ही मोदी आणि शाह यांची भूमिका अत्यंत घातक आहे. मी पहिल्यापासून आणि आजन्म बाळासाहेब ठाकरे यांचाच माणूस राहिन. राहुल गांधी यांनी या देशाच्या नेतृत्वाला एक नवी दिशा दिली आहे. मी शरद पवार यांच्यावर अजिबात नाराज नाही; आमच्या काही पक्षीय भूमिका आहेत आणि त्या आम्ही ठामपणे मांडतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com