देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात सध्या एका नव्या समीकरणाची चर्चा रंगलीये. निमित्त ठरलंय ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांचं एक खळबळजनक विधान....दिल्लीत ममता बॅनर्जी आणि सोनिया गांधींच्या भेटीनंतर TMCच काँग्रेसमध्ये विलिनीकरणाच्या उलटसुलट चर्चा सुरू असतानाच संजय राऊतांनी थेट 'अखंड काँग्रेस'चा नारा दिलाय. काँग्रेसमधून फुटून बाहेर पडलेले सर्व प्रादेशिक पक्ष पुन्हा एकत्र आले, तर मोदी सरकारला रोखता येईल, असा दावा राऊतांनी केलाय. इतकचं नाही तर अखंड काँग्रेससाठी शरद पवारांना पुढाकार घेण्याचं आवाहनही राऊतांनी केलंय.. तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंनीही राऊतांच्या आवाहनाला प्रतिसाद दिलाय...
अखंड काँग्रेससाठी राऊतांची पवारांना साद
मुळात देशात काँग्रेसमधून फुटून अनेक पक्षांची स्थापना झालीय... त्यामुळे हे सर्व पक्ष भाजपविरोधात एकत्र लढत असले, तरी राऊतांना आता केवळ आघाडी नको, तर एका 'अखंड प्रबळ पर्याया'ची अपेक्षा आहे.
मात्र राऊतांच्या या आवाहनावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी हे राऊतांचं वैयक्तिक मत असल्याच सांगून मूळ मुद्द्याला बगल दिलीय.तर भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांनी अखंड काँग्रेस होणं शक्य नसल्याचं सांगून मविआवर टीका केलीय.....
मात्र काँग्रेसमधून फुटून देशात कोणत्या पक्षांची स्थापना झालीय...पाहूयात...
1998 मध्ये ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसपासून वेगळे होऊन अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस पक्ष काढला...
1999 मध्ये शरद पवारांनी सोनिया गांधींची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची स्थापना केली...
2001 साली के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी काँग्रेसपासून फारकत घेत.. भारत राष्ट्र समिती पक्षाच्या माध्यमातून लढा उभारला...
2011 साली आंध्र प्रदेशात वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून वाय. एस. आर. काँग्रेस पक्षाची स्थापना केली...
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर ममता बॅनर्जींनी थेट १० जनपथवर सोनिया गांधींच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळीही टीएमसीच्य़ा काँग्रेसमधील विलिनीकरणाच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र आता संजय राऊतांच्या 'अखंड काँग्रेस'च्या विधानामुळे काँग्रेसच्या एकीकरणाची चर्चा सुरू झालीय. मात्र त्यांनी पवारांना यासाठी पुढाकार घेण्यासाठी दिलेली साद दिलीय. त्याला आता पवार कसा प्रतिसाद देतात आणि 1990 च्या दशकात काँग्रेसची झालेली शकलं भविष्यात एकत्र येतील का? हे पाहणं महत्त्वाचं आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.