Sangli News
Sangli NewsSaam tv

Sangli News: सव्वातीन लाखांचे मोबाइल चोरी; विटा पोलिसांकडून शोध, संबंधित फिर्यादींना मोबाइल सुपूर्द

Sangli News सव्वातीन लाखांचे मोबाइल चोरी; विटा पोलिसांकडून शोध, संबंधित फिर्यादींना मोबाइल सुपूर्द
Published on

सांगली : सांगलीच्या विटा पोलिसांना तब्बल सव्वातीन लाखांच्या चोरीस गेलेल्या मोबाइलचा शोध घेण्यात यश आले आहे. याकामी (Sangli) सांगली पोलिस दलातील सायबर विभागाची देखील मोठी मदत मिळाली. हे सर्व मोबाइल (Mobile) संबंधित फिर्यादींना परत देण्यात आले. (Maharashtra News)

Sangli News
Wardha News: मुदतबाह्य बॉम्ब निकामी करताना स्फोट; गावकऱ्याचा मृत्यू

सांगली जिल्ह्यातील विटा शहर व परिसरातून हरविलेल्या मोबाइलच्या तक्रारी सातत्याने दाखल होत होत्या. यामध्ये चोरीस गेलेल्या सुमारे ३ लाख १२ हजार रुपये किमतीच्या २० मोबाइलचा शोध लावण्यात विटा पोलिसांना यश आले आहे. या कामगिरीसाठी सांगलीच्या सायबर विभागाची मदत घेण्यात आली.

Sangli News
Child Missing Case: त्या बेपत्ता मुलांचा लॅपटॉपमुळे लागला शोध; शिर्डीतील खाजगी भक्त निवासात होती तिन्ही मुले

खानापूर तालुक्यासह अन्य भागातून विटा शहरात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांचे मोबाइल गर्दीच्या ठिकाणी चोरट्यांनी लांबविले होते. तर काही जणांचे मोबाइल गहाळ झाले होते. याबाबत विटा पोलिसांत नोंद झाली होती. याबाबत विटा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी सांगलीच्या सायबर क्राइम विभागाची मदत घेतली. त्यावेळी (Police) पोलिसांना ३ लाख १२ हजार रुपये किमतीचे गहाळ झालेले मोबाइल सापडले. हे सर्व मोबाइल संबंधित फिर्यादींना परत देण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com