Child Missing Case: त्या बेपत्ता मुलांचा लॅपटॉपमुळे लागला शोध; शिर्डीतील खाजगी भक्त निवासात होती तिन्ही मुले

Jalna News त्या बेपत्ता मुलांचा लॅपटॉपमुळे लागला शोध; शिर्डीतील खाजगी भक्त निवासात होती तिन्ही मुले
Jalna News Child Missing Case
Jalna News Child Missing CaseSaam tv
Published On

जालना : जालना शहरातून ३ लहान मुलं बेपत्ता झाल्यानं खळबळ उडाली होती. बेपत्ता झालेले तिनही मुलं (Jalna News) चांगले मित्र आहेत. अखेर या मुलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. ही तिघंही मुलं शिर्डीतील (Shirdi) एका खाजगी निवासातून ताब्यात घेण्यात आली आहेत. (Tajya Batmya)

Jalna News Child Missing Case
Tomato Price: टोमॅटोची लाली झाली कमी; दर घसरल्याने गृहिणींना दिलासा

जालना शहरातून अंकित जाधव (वय १५), स्वराज मापारी (वय १४) आणि हर्षद देवकर (वय १४) अशी बेपत्ता झालेल्या तिन्हीही मुलांची नावं होती. यातील एकाने चिट्ठी लिहून घर सोडलं होतं. तर दुसऱ्याने स्नॅपचॅटवर घरच्यांना मॅसेज केला होता. तीन मुले एकाचवेळी गायब झाल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक राहुल खाडे, पोलिस उपअधीक्षक सचिनबापू सांगळे यांनी हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेत संवेदनशीलपणे हाताळत सायबर यंत्रणा आणि कदीम जालना पोलीसांना कामाला लावले होते.

Jalna News Child Missing Case
Wardha News: मुदतबाह्य बॉम्ब निकामी करताना स्फोट; गावकऱ्याचा मृत्यू

लॅपटॉपमुळे लागला शोध 

बेपत्ता मुले शोधण्यासाठी पोलीस प्रशासनाने तब्बल ४८ तास शर्थीचे प्रयत्न केले. ही तिघेही मुलं शिर्डी येथे एका खाजगी भक्त निवासातील एक खोलीत थांबलेले असतांना त्यांना आज सकाळी कदीम जालना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांच्या पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे आणि अंमलदार रामेश्वर राऊत यांच्या टीमने ताब्यात घेतली आहेत. या मूलांजवळ असलेल्या लॅपटॉपमुळे त्यांचा शोध घेण्यासाठी मदत झाली. उपनिरीक्षक नागरे हे तिन्ही मुलांना सोबत घेऊन जालन्याकडे रवाना झाले आहेत. दरम्यान मुलं मिळाले असल्याचा निरोप पोलीस अधीक्षक यांना येताच मुलांच्या आईवडिलांचा आनंद गगणात मावेनासा झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com