Wardha News: मुदतबाह्य बॉम्ब निकामी करताना स्फोट; गावकऱ्याचा मृत्यू

मुदतबाह्य बॉम्ब निकामी करताना स्फ़ोट; गावाकऱ्याचा मृत्यू
Wardha News
Wardha NewsSaam tv
Published On

चेतन व्यास
वर्धा
: केंद्रीय दारुगोळा भंडाराच्या डिमॉलिश सेंटरवर मुदतबाह्य बॉम्ब निकामी करण्याचे कामं सुरु होते. दरम्यान बॉम्बचा स्फ़ोट (Bomb Blast) झाल्याने एका गावाकऱ्याच्या पोटात लोखंडाचा तुकडा रुतल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. (Wardha) ही घटना आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. योगेश किशोर नेरकर (रा. सोनेगाव आबाजी) असं मृतकाच नाव आहे. (Live Marathi News)

Wardha News
Marathwada Rain Update : मराठवाड्यातील स्थिती चिंताजनक; अपुऱ्या पावसामुळे पाणीसंकट, धरणांमध्ये किती पाणीसाठा?

देवळी पोलीस स्टेशन हद्दीतील सोनेगाव जवळील केंद्रीय दारुगोळा भंडाराच्या डिमॉलिश सेंटर हे क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र असूनही गावाकऱ्याने प्रवेश केला होता. तो परिसरातील एका झाडाखाली उभा असतांना बॉम्ब निकामी करण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान बॉम्बचा स्फोट झाल्यावर लोखंडी तुकडा गावाकऱ्याच्या पोटात शिरल्याने त्याचा मृत्यू झाला. डिमॉलिश करतांना जवळपास २० ते २५ मजूर तेथे हजर होते. सुदैवाने त्यांना कुठलीही इजा पोहचली नाही. 

Wardha News
Tomato Price: टोमॅटोची लाली झाली कमी; दर घसरल्याने गृहिणींना दिलासा

दुसऱ्यांदा घडली घटना 

घटनेची माहिती मिळताच देवळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यापूर्वी २० नोव्हेंबर २०१८ रोजी याच ठिकाणी कालबाह्य दारुगोळा निकामी करतांना स्फोट झाला होता. यात सहा लोकांचा मृत्यू झाला होता. तर जवळपास दहा मजूर जखमी झाले होते. आता दुसऱ्यांदा ही घटना घडलीय.  सदर डिमॉलिश सेंटरवर प्रतिबंधित क्षेत्र असतांनाही तेथे नागरिकाने प्रवेश केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com