नाशिक : मागील महिनाभरापासून टोमॅटोचे दर गगनाला भिडले होते. प्रतिकिलो २०० ते २५० रुपये किलो इतका भाव (Nashik) किरकोळ विक्रीचा झाला होता. तर मार्केटमध्ये प्रति कॅरेट ३२०० ते ३५०० हजार रुपये दर झाला होता. आता मात्र या दारात घसरण (Tomato) झाल्याचे पाहावयास मिळत असून गृहिणींना दिलासा मिळाला आहे. (Latest Marathi News)
बाजार समितीच्या होलसेल बाजारात देखील टोमॅटोचे दर वाढलेले होते. मात्र आता नाशिकच्या बाजार समितीत टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटोचे दर घसरले असून मागील पंधरवड्यात दिवसांत टोमॅटोचे २० किलोच्या क्रेटमागे १७०० रुपयांची घसरले आहेत.
मागील आठवड्यात टोमॅटोला २ हजार ६५१ रुपये दर मिळाला होता. तर या आठवड्यात टोमॅटोला अवघे ९५१ रुपयांचा दर मिळाला आहे. टोमॅटोची लाली १७०० रुपयांनी कमी झाली आहे. भारतीय बाजारपेठेत नेपाळचे टोमॅटो विक्रीसाठी आल्याने दर घसरल्याचं व्यापाऱ्यांच म्हणणं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.