

गेल्या तीन वर्षांपासून पाण्यासाठी शेतकऱ्यांची एक मागणी आहे. चर खुदाई करून कॅनॉलमधून (Sangli News) पाणी तलावात सोडायच्या कामाला सुरवात झाली. परंतु वनविभागाने (Forest Department) हे काम बंद पडले. यावेळी शेतकऱ्यांनी अश्रू ढाळत अधिकाऱ्यांच्या पाय पडल्या. मात्र या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दया आली नाही. (Maharashtra News)
सांगलीच्या जत तालुक्यातील माडग्याळसह सात गावांना म्हैसळ योजनेतून पाणी मिळावे; म्हणून मायथळ कॅनॉलमधून चर काढून माडग्याच्या तलावात पाणी सोडावे. अशी शेतकऱ्यांची गेल्या तीन वर्षापासून मागणी होती. त्यास अनुसरून जिल्हा बँकेचे संचालक जमदाडे यांनी खासदार संजयकाका पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून चर खुदाईसाठी खासदार यांच्याकडे पाठपुरावा करून चर खुदाईसाठी शासनाच्या मशनिरी उपलब्ध करून दिल्या. तसेच खासदार फंडातून डिझेलसाठी १२ लाखाचा निधी मिळाल्यावर या कामाला सुरुवात झाली.
शेतकरी माळावरच बसून
मात्र आज दुसऱ्याच दिवशी वन विभागांनी सदरची जागा ही आमची आहे. म्हणून जागेवर येऊन काम बंद पाडले. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर आपली कैफियत मांडत शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. साहेब खूप वाईट परिस्थिती आहे. काम बंद करू नका. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही पाण्याची वाट पाहतोय. असे म्हणत अधिकाऱ्यांचे पाय धरले. मात्र वन विभागांनी काम सुरू होऊ दिले नाही. त्यामुळे ४०० हून अधिक शेतकरी माळावर बसून आहेत. जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.