वसई : महावितरणकडून वीज चोरी करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई सुरु केली आहे. या कारवाई दरम्यान (Vasai) वसई पूर्व उपविभागात राबविलेल्या मोहिमेत ८४ वीज चोर आढळून आले आहेत. त्यांच्याकडून ८० हजार ३७२ युनिट विजेची चोरी (Mahavitaran) झाल्याचे उघडकीस आले आहे. (Tajya Batmya)
महावितरणकडून विजेचा अनधिकृत वापर करत असलेल्यांविरुद्ध धडक मोहीम राबविली जात आहे. याकरिता पथक नेमण्यात आले आहेत. या दरम्यान १६ पथकांनी धानीव बाग, पेल्हार, वाकणपाडा, शिवाजीनगर, वसई फाटा, सोपारा फाटा, दांगडेपाडा, जाधवपाडा, गावदेवी, धानीव भागात व्यापक शोध मोहिम राबवली. एकूण ७५७ वीज जोडण्यांची तपासणी यात करण्यात आली. त्यात ८४ जणांकडे विजेचा चोरटा वापर सुरू (Electricity Theft) असल्याचे आढळले. त्यानुसार संबंधिताना चोरीच्या (MSEDCL) विजेचे देयक व तडजोडीची रक्कम भरण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत.
तर होणार वीज चोरीचा गुन्हा दाखल
वीज करत असल्याचे सापडून आलेल्यांकडे ८४ हजाराच्यावर युनिटद्वारे १५ लाख ९ हजार ३०० रुपये किंमतीची वीज चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. विहित मुदतीत या रकमेचा भरणा न करणाऱ्यांविरुद्ध वीज कायदा- २००३ च्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल होण्यासाठी फिर्याद देण्यात येणार आहे. वीज चोरीच्या गुन्ह्यात जबर शिक्षा आणि दंडाची तरतूद असून कोणत्याही परिस्थितीत विजेचा अनधिकृत वापर टाळावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.