Washim Crime News: महिलेच्या बॅगमधून पर्स लंपास; दोन लाख पंधरा हजार रुपयांचा ऐवज पळवला

Washim News : महिलेच्या बॅगमधून पर्स लंपास; दोन लाख पंधरा हजार रुपयांचा ऐवज पळवला
Washim Crime News
Washim Crime NewsSaam tv
Published On: 

मनोज जयस्वाल

वाशिम : वाशिम पोलिसांचं नेमकं चाललं काय हेच कळत नाही. त्याच कारण म्हणजे वाशिम शहर त्यानंतर (Washim) मंगरूळपिर शहरातून चोरीचे सत्र सुरूच आहे. आज मंगरूळपिर बसस्थानक परिसरातून २ लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल बसमध्ये चढताना लंपास केल्याची घटना समोर आली आहे. (Live Marathi News)

Washim Crime News
Dengue Viral : डेंग्यू सदृश्य आजाराने मुलीचा मृत्यू; गावात हिवतापाची अनेकांना लागण

वाशिम शहर व परिसरात भुरट्या चोरीचे सत्र सुरूच आहे. यात मागील तीन दिवसात वाशिम शहरात ३ ठिकाणी, मंगरूळपिर शहरात दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. यात पुन्हा आज बसमध्ये चढत असलेल्या महिलेची पर्स लांबविल्याची घटना घडली आहे. यात रोख रक्कम व काही सोन्याचे दागिने देखील होते. 

Washim Crime News
Nashik Crime News: मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल केल्याने मारहाण करत तरुणाची हत्या; अंबडमधील धक्कादायक प्रकार

बस थेट पोलीस स्टेशनला 

आज मंगरूळपीर बसस्थानक परिसरातून अकोला दिग्रस बसमध्ये चढताना बॅगमधून पर्स लंपास केल्याची घटना घडली. त्यानंतर बस पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आली. पोलिसांनी बसमधील प्रवाश्यांची तपासणी केली. मात्र काहीच आढळले नाही. त्यानंतर बस पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com