

Sangli News : घरपट्टी, पाणीपट्टी कराची (tax) थकबाकीची वसुली व्हावी यासाठी सांगली महापालिकेने (sangli miraj kupwad municipal corporation) आजपासून थकबाकीदारांचे बोर्ड भरवस्तीत चौकात झळकविण्याचा निर्णय घेतला आहे. याबराेबरच थकीत रक्कम लवकरात लवकर न भरल्यास मिळकतधारकाचे पाणी (water) कनेक्शन ताेडण्याचा कठाेर निर्णय घ्या असा आदेश आयुक्त सुनील पवार यांनी प्रशासनाला दिला आहे. (Maharashtra News)
महापालिकेने आतापर्यंत महापालिका क्षेत्रातील एक लाख मिळकतधारकांना जप्तीच्या नोटिसा बजावल्या आहेत. चाळीस हजार ग्राहकांना थकबाकी न भरल्यास त्यांचे नळ कनेक्शन तोडण्याच्या नोटिसा देखील बजावण्यात आल्या आहेत.
थकीत घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेने पथकांची नियुक्ती केली आहे. वसुलीबाबत कुचराई केल्यास कायम कर्मचाऱ्याची एक वेतनवाढ रोखा तसेच मानधन कर्मचाऱ्यावर सक्त कारवाई करा असे आदेशही आयुक्त सुनील पवार यांनी प्रशासकीय बैठकीत दिले आहेत. त्यामुळे आजपासून थकीत कर वसूल करण्यासाठी (sangli) महापालिका कर्मचारी मिळकतधारकांच्या घरापर्यंत पाेहचू शकतात असे चित्र आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.