Maharashtra Exams Postponed : विद्यार्थ्यांनाे ! विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित; जाणून घ्या कारण

कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा.
exam, teachers strike, punyashlok ahilyabai holkar solapur university
exam, teachers strike, punyashlok ahilyabai holkar solapur universitysaam tv

Maharashtra News : विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी आजपासून एकत्रित संपावर (strike) गेले आहेत. परिणामी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या (punyashlok ahilyabai holkar solapur university) आजपासून होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित (Exam Postponed) करण्यात आल्या आहेत.

exam, teachers strike, punyashlok ahilyabai holkar solapur university
College Student : अ‍ॅलेस डेथ, What I Do ? असं हातावर लिहून विद्यार्थ्याने काॅलेजमध्ये संपवलं जीवन

महाविद्यालयीन (college) शिक्षेकतर कर्मचाऱ्यांनी परीक्षा कामकाजवर बहिष्कार आंदोलन सुरु केल्याने पुढील आदेशपर्यंत परीक्षा स्थगित केल्याची माहिती परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी दिली.

बीए, बीएससी, बीबीए, लाॅ यासह सर्वच विभागाच्या परीक्षा तात्पूरत्या स्वरुपात स्थगित केल्या गेल्या आहेत. शिक्षेकतर कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यानंतर परीक्षांचे वेळापत्रक विद्यार्थ्यांना सांगितले जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली. (Breaking Marathi News)

exam, teachers strike, punyashlok ahilyabai holkar solapur university
Pandharpur Maghi Yatra : पंढरीत शेकडाे भाविकांना अन्नातून विषबाधा; डाॅक्टरांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या मागण्या

सेवाअंतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेले शासन निर्णय पूर्ववत लागू करा.

सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार १०.२०.३० वर्षानंतरच्या लाभाची योजना विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना लागू करा.

सातव्या वेतन आयोगापासून वंचित असलेल्या १४१० विद्यापीठीय शिक्षकेतत्र कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा.

महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या मागण्या

विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ ते प्रत्यक्ष सातवा वेतन लागू झाला, त्या कालावधीतील वेतनाच्या फरकाची थकबाकी अदा करावी.

विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता द्या.

२००५ नंतर सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करा.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com