College Student : अ‍ॅलेस डेथ, What I Do ? असं हातावर लिहून विद्यार्थ्याने काॅलेजमध्ये संपवलं जीवन

या सगळ्या घटनेमुळे आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Palghar
Palgharsaam tv

Palghar Crime News : डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या तलासरीतील ज्ञानमाता आदिवासी माध्यमिक आश्रम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय (palghar) झरी (zari) येथे एका विद्यार्थ्याने बाथरूम मध्येच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अँलेस विनय लखन असे मृत विद्यार्थ्याचे (student) नाव आहे.

Palghar
Best Way To Remove Private Part Hair : प्रायवेट पार्ट्सचे केस काढताना तुम्ही देखील 'या' चुका करता का? फॉलो करा 'या' टिप्स...

अँलेस हा तलासरी तालुक्यातील सावरोळी उधानपाडा येथील मूळचा रहिवासी. ताे अकरावीच्या विज्ञान शाखेत शिक्षण घेत हाेता. त्याने प्रेम प्रकरणाच्या नैराश्यातून ही आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

ॲलेस बाथरूममध्ये असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला वस्तीगृह व्यवस्थापन आणि वस्तीगृहातील कर्मचाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात (hospital) उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी त्याला डॉक्टरांकडून मृत घोषित करण्यात आले.

Palghar
Budget 2023 : अर्थसंकल्प नव्हे हे तर हेडलाईन मॅनेजमेंट, शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पानं : रवीकांत तुपकर

अँलेस डेथ आणि व्हाट आय डू ? अस मृताच्या हातावर लिहिलं असल्याची माहिती समोर आली आहे. तलासरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. या सगळ्या घटनेमुळे आश्रम शाळांमध्ये (school) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com