Ration : रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी; येत्या ७ ते ९ फेब्रुवारीला रेशन धान्य वाटप बंद राहणार, कारण...

या संपात राज्यभरातील 55 हजार रेशन दुकानदार सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीनं देण्यात आली.
ration, jalna
ration, jalnasaam tv

Ration Shopkeeper Strike : अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघाने राज्यभरात तीन दिवस रेशन बंद आंदाेलन पुकारले आहे. येत्या सात, आठ आणि दहा फेब्रुवारीला रेशन धान्य वाटप करु नये असे आवाहन रेशन दुकानदारांना केले आहे. (Breaking Marathi News)

ration, jalna
Pandharpur : माघी यात्रेसाठी पंढरपुर सज्ज; विठ्ठल मंदिर सजले, पाेलिस यंत्रणा सतर्क

अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघाने आज जालन्यात (jalna) झालेल्या रेशन दुकानदारांच्या मेळाव्यात संपाचा निर्णय घेतला. कोरोना काळापासून सुरु असलेल्या मोफत धान्य वाटपाचं अद्याप कमिशन मिळालेलं नाही. त्याचबरोबर कमिशनमध्ये वाढ व्हावी आणि सर्व गरीब जनतेला पूर्वीप्रमाणे मोफत धान्य वाटप व्हावे या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदाेलन छेडले जात आहे.

ration, jalna
Jalna : मोसंबीचा दर गडगडला; उत्पादक शेतकरी चिंतेत

या संपात राज्यभरातील 55 हजार रेशन (ration) दुकानदार सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीनं देण्यात आली. विजयकुमार पंडीत (जाॅईंट सेक्रेटरी, रेशन दुकानदार संघटना) म्हणाले आमच्या मागण्या रास्त आहेत. त्यामुळे सरकार (maharashtra government) त्या पुर्ण करेल असा आम्हांला विश्वास आहे. परंतु मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात तीव्र आंदाेलन (aandolan) छेडले जाईल असा इशारा देखील पंडीत यांनी दिला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com