Maghi Yatra In Pandharpur : माघी यात्रा कालावधीत भाविकांच्या सुरक्षेसाठी पंढरपुरात पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. यात्रा काळात विविध ठिकाणी एक हजार 550 पोलीस अधिकारी व कर्मचारी, एक एसआरपीएफ तुकडी असा बंदोबस्त असणार आहे. दरम्यान माघी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर (vitthal rukmini mandir) विद्युत दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. दिव्यांच्या प्रकाशाने मंदिर व परिसर उजळून निघाला आहे. (Pandharpur Latest Marathi News)
माघ शुद्ध एकादशी एक फेब्रुवारीला आहे. या माघी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी पंढरपुरात भाविक मोठ्या प्रमाणात येतात. वारीत येणाऱ्या भाविकांच्या व स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी तसेच वारी सुरक्षितपणे पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
सुरक्षेसाठी व वाहतुक नियत्रंणासाठी 1 हजार 550 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये 02 पोलीस उपअधिक्षक, 21 पोलीस निरिक्षिक, 69 सहाय्यक पोलीस निरिक्षक व पोलीस उपनिरिक्षक, 713 पोलीस कर्मचारी व 700 होमगार्ड तसेच 01 एसआरपीएफ कंपनीच्या तुकडी तर एक शिघ्र कृती दल पथक नियुक्त करण्यात आले आहेत. (Maharashtra News)
वारी कालावधीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नदीपात्र, 65 एकर, महाव्दार, महाव्दार घाट, पत्राशेड या सहा ठिकाणी वॉच टॉवर करण्यात आले आहेत. तसेच नदीपात्रासह नव्याने नगर प्रदक्षिणा मार्ग, मंदीर परिसर येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. (Pandharpur Maghi Yatra Latest Marathi Updates)
अपघात मुक्त वारीसाठी पोलिसांची विशेष मोहिम
यात्राकाळात होणारे अपघात (accident) कमी करण्यासाठी सोलापूर (solapur) ,सांगली आणि कोल्हापूर विभागातील पोलिसांनी विशेष मोहिम हाती घेतली आहे. पंढरपूरकडील महामार्गावर विशेष गस्त व पेट्रोलिंग केले जाणार आहे. विशेषता पंढरपूर -कोल्हापूर या महामार्गावर ठिकाणी पोलिस केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी म्हणाले पाेलिस दल वारक-यांचे प्रबोधन करेल. यात्राकाळात वारक-यांची सुरक्षा महत्वाची आहे. चोरीच्या घटना टाळण्यासाठी वारकरी वेशात पोलिस काम करणार आहेत. वारी काळात भाविकांनी सतर्क राहावे असे आवाहनही त्यांनी केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.