- सिद्धेश म्हात्रे, अजय दुधाणे, सचिन कदम
Kokan Teachers Constituency Election Marathi Updates : कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदानाला (Kokan Teachers Constituency Election Voting Begins) सकाळी सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच ठिक ठिकाणच्या मतदान केंद्रांवर शिक्षकांची मतदानासाठी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली. दरम्यान पनवेल येथील दी. बा. पाटील विद्यालय या मतदान केंद्रावर मविआने मतदान (voting) केंद्र कर्मचा-यावर आक्षेप नाेंदवत त्याला बाहेरचा रस्ता दाखविला. त्यामुळे केंद्रावर काही काळ गाेंधळ निर्माण झाला.
ज्ञानेश्वर म्हात्रेंचा विजयाचा दावा
कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी या निवडणुकीत एकूण आठ उमेदवार असले तरी मुख्य लढत ही महाविकास आघाडीचे (mva) उमेदवार बाळाराम पाटील (balaram patil) आणि महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे (dnyaneshwar mhatre) यांच्यामध्ये होणार आहे. आज सकाळी ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी शिक्षकांचा आमदार शिक्षकच होणार असा विश्वास माध्यमांशी बाेलताना व्यक्त केला.
अंबरनाथला उत्साहात मतदान
या निवडणुकीसाठी अंबरनाथ तहसीलदार कार्यालयात या भागातील मतदान होत आहे. आज सकाळी आठ वाजता मतदान सुरू झाले मात्र शिक्षक मतदारांनी सकाळी साडेसात वाजल्यापासून अंबरनाथ तहसीलदार मतदान केंद्राबाहेर गर्दी केली होती. अंबरनाथ मतदान केंद्रावर शिक्षक मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला असून मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. या मतदान केंद्रावर दोन मतदान केंद्र असून एकूण 1709 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत तसेच या मतदान केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे.
रायगड जिल्ह्यात शातंतेत मतदान सुरु
कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी रायगड जिल्ह्यात 27 ठिकाणी मतदान घेतले जात आहे. या जिल्ह्यात 10 हजार 101 मतदार बजावणार मतदानाचा हक्क. त्यात 5 हजार 746 महिला तर 4 हजार 355 पुरुष मतदार आहेत. सकाळी 8 वाजता रायगडमध्ये मतदानाला सुरूवात झाली आहे. सर्वत्र शांततेत मतदान सुरु आहे.
पनवेल येथे मतदान केंद्रावर गोंधळ
दी. बा. पाटील विद्यालयात मतदान शांततेत सुरु हाेते. या ठिकाणी मविआने एका कर्मचाऱ्यावर आक्षेप घेतला. संबंधित कर्मचारी हा मतदारांची दिशाभूल करत असल्याचा आराेप महाविकास आघाडीने केला. त्यामुळे त्याला मतदान केंद्रातून बाहेर काढा अशी जाेरदार मागणी मविआच्या र्मथकांनी केली. त्यावेळी पाेलिस, प्रशासन आणि मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला केंद्रातून बाहेर काढण्यात आले.
अशी केली जात हाेती मतदारांची दिशाभूल
तिथे बसलेला कर्मचारी हा भाजप (bjp) उमेदवाराल मतदान करा असे संबंधित उमेदवाराच क्रमांक सांगून मतदारांची दिशाभुल करीत हाेता असे मविआच्या कार्यकर्त्यांनी अधिका-यांना नमूद केले. (Breaking Marathi News)
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.