Sangli Crime: सांगलीत चोरट्यांचा सुळसुळाट, सहा ठिकाणी मारला डल्ला, लाखोंचा ऐवज केला लंपास

Sangli Kundal Crime News: सांगलीच्या पलूस तालुक्यातील कुंडल येथे एका रात्रीत सहा ठिकाणी चोरी झाल्याची घटना समोर आलीय. यामध्ये तीन घरे आणि तीन व्यावसायिकांच्या दुकानात चोरट्यांनी डल्ला मारलाय.
Sangli Crime News
Sangli Crime NewsSaam tv
Published On

सांगलीच्या पलूस तालुक्यातील कुंडल येथे एका रात्रीत सहा ठिकाणी चोरी झाल्याची घटना समोर आलीय. यामध्ये तीन घरे आणि तीन व्यावसायिकांच्या दुकानात चोरट्यांनी डल्ला मारलाय. दुकनात चोरट्यानं धुमाकूळ घालत एकूण ६६ हजारांचा मुद्देमाल लंपास केलाय. चोरट्यानं विविध घरांमधून जवळपास २ लाख ४१ हजारांचा मुद्देमालांवर डल्ला मारलाय. या चोरट्याचे सीसीटीव्ह फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून, अधिक तपाल पोलीस करीत आहेत.

कुंडलमध्ये पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास खारगे चौक, सत्यविजय चौक, क्रांतीनगर चौक येथून चार अनोळखी चोरट्यांनी विविध मुद्देमालांवर डल्ला मारलाय. शौर्य मेन्स वेअर, श्वास किराणा दुकान, सावकार मोबाईल दुकानाचे कुलूप तोडून जवळपास ६६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय.

Sangli Crime News
Parbhani Crime: क्रूरतेचा कळस! तिसरीही मुलगीच झाली म्हणून पत्नीला पेट्रोल टाकून पेटवले, परभणी हादरली

हणमंत माळी यांच्या २० ग्राम सोने, मोबाइल व रोकड ३५ हजार रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारलाय. मनीषा पवार यांचे १५ ग्राम सोने, सुधा विभुते यांचे १० ग्राम सोने असा सोन्याच्या ऐवजावर चोरट्यांनी हातसफाई केलीय. सकाळी चोरीच्या घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. चोरट्यांनी सहा ठिकाणी डल्ला मारल्याचे समजताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली.

Sangli Crime News
Badlapur Crime : बदलापूर पुन्हा हादरलं; मैत्रिणीच्या साथीने रिक्षाचालकाकडून 19 वर्षीय तरुणीवर अत्याचार

चोरट्यांनी डल्ला मारल्याची माहिती मिळाल्यानंतर श्वानपथक, फिंगर प्रिंट तसेच स्थानिक गुन्हे शाखांमध्ये चोरीची माहिती दिली. नंतर गावातील सर्व सीसीटीव्ही तपासण्यात आले. तसंच इतर जिल्ह्यातून कुणी आरोपी जेलमधून फरार आहे का? कुणी सराईत गुन्हेगार कैदीतून बाहेर आले आहेत का? याची माहिती घेण्याचं काम सुरू आहे. चोरट्यांच्या सुळसुळाटानंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी या चोरीचा छडा लवकरात लवकर लावावा, असे नागरिकांकडून मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com