Sangli ZP School: पालकांचे टेन्शन दूर! मुलं शाळेत पोहचल्यावर आणि सुटल्यानंतर येणार मेसेज; सांगलीच्या ZP शाळेची होतेय चर्चा

Sangli ZP School Digital Identity Card for Students: सांगलीतील कवठेमहांकाळ येथे जिल्हा परिषदेच्या शाळेने एक नवीन उपक्रम सुरु केला आहे. आता मुलं शाळेत गेल्यावर आणि सुटल्यावर त्यांच्या पालकांना मेसेज जाणार आहे.
Sangli ZP School
Sangli ZP SchoolSaam Tv
Published On
Summary

सांगलीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत अनोखा उपक्रम

मुलांच्या आयडी कार्डला स्कॅनर

मुलं शाळेत पोहचल्यावर आणि सुटल्यावर पालकांना जाणार मेसेज

प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलाची काळजी असते. आपली मुले शाळेत व्यस्थित जातात ना, तिकडे व्यवस्थित वागतात ना अशी काळजी असते. मुलं शाळेत पोहचली की नाही, मुलं शाळेतून निघाली की नाही हा घोर सतत पालकांना सतावत असतो. याला कारण आहे अलीकडे लहान मुलांच्या अपहरणाच्या वाढत चाललेल्या घटना. याच पार्श्वभूमीवर कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड एम गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये डिजिटल आयडेंटिटी हा प्रयोग राबवला गेला आहे.

Sangli ZP School
New Highway: पुणे ते नाशिक प्रवास होणार सुसाट, चाकण- तळेगावजवळ तयार होतोय नवा मार्ग

आता तुमची मुले शाळेत पोहचली की नाही किंवा शाळेतून निघाली की नाही याचा मेसेज थेट पालकांना मिळणार आहे.मुलांच्या गळ्यात असलेल्या आयडेंटिटी मध्ये मागील बाजूस एक स्कॅनर लावला गेला आहे. स्कॅनर शाळेत शिक्षकांनी स्कॅन केल्यानंतर पालकांना मेसेज जातो की मुलगा शाळेमध्ये आलेला आहे. संध्याकाळी पाच वाजता परत शाळा सुटताना स्कॅनिंग केल्यानंतर पुन्हा पालकांना मेसेज जातो की शाळा सुटलेली आहे आणि मुलगा शाळेतून घरी येण्यास बाहेर पडला आहे .

कवठेमहांकाळ या गावातील अंगणवाडीमध्ये देखील हा प्रयोग राबवला जातोय.यामुळे पालकांच्या मोबाईल वरती थेट मुलं शाळेत आल्याची आणि मुलं शाळेतून घरी येत असल्याचा मेसेज येत असल्यामुळे पालकांची टेन्शन काहीच कमी झालं आहे.

Sangli ZP School
EPFO Pension Hike: EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! किमान पेन्शन १००० रुपयांवरुन ९००० होणार? वाचा सविस्तर

शाळा सुटल्यानंतर बऱ्याचदा मुलं लवकर घरी पोहोचता येते नाही किंवा सुखरूप घरी पोहोचतात की नाही ह्याच्याबद्दलची शिक्षकाना नेहमी टेन्शन लागलेले असतो. पण ह्या डिजिटल आयडेंटिटी मुळे मुले शाळेतून निघाली की पालकांना मेसेज जातो त्यामुळे मुले वेळेत घरी सुखरूप पोहोचली का नाही याची काळजी पालक देखील घेतात आणि आणि त्यामुळे आम्हीही निश्चित राहतो असे शिक्षकांनी आणि पालकांनी सांगितले.

Sangli ZP School
Success Story: १३ वेळा नापास; हार नाही मानली; UPSC केली क्रॅक; IAS अवनीश कुमार यांचा प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com