Success Story: १३ वेळा नापास; हार नाही मानली; UPSC केली क्रॅक; IAS अवनीश कुमार यांचा प्रवास

Success Story of IAS Awanish Kumar: आयएएस अवनीश कुमार यांनी दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली आहे. त्यांनी याआधी १३ वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा दिल्या होत्या. त्यात ते अपयशी ठरले होते.
Success Story
Success StorySaam tv
Published On
Summary

IAS अवनीश शरण यांचा प्रेरणादायी प्रवास

दुसऱ्या प्रयत्नात केली UPSC क्रॅक

एकूण १३वेळा परीक्षेत नापास

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागते. कितीही अपयश आले तरीही त्यावर मात करता यायला हवी. असंच काहीस अवनीश शरण यांनी केलं. त्यांनी मोठ्या जिद्दीने यूपीएससी परीक्षा पास केली. लाखो उमेदवार दरवर्षी यूपीएससी परीक्षा देतात.परंतु सर्वांनाच यश मिळत नाही. सातत्य आणि मेहनत केल्यावर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.

Success Story
Success Story: ठाण्याचा लेक झाला IPS; २२व्या वर्षी क्रॅक केली UPSC; अभिजित पाटील यांचा प्रवास

अवनीश शरण हे मूळचे बिहारचे आहेत. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण सरकारी शाळेतून केले. ते पहिल्यापासूनच अभ्यासात फार काही हुशार नव्हते. त्यांना १०वीत फक्त ४४.७ टक्के गुण मिळाले होते. परंतु त्यांनी याचा परिणाम अभ्यासावर होऊन दिला नाही. त्यांनी उलट प्रयत्न केले. त्यांना १२वीत ६५ टक्के गुण मिळाले होते. यानंतर ग्रॅज्युएशनमध्ये त्यांना ६० टक्के गुण मिळाले होते.

Success Story
Success Story: 12th फेल, खचले नाही, जिद्दीने क्रॅक केली UPSC; नाशिकचा लेक IPS झाला

अवनीश यांनी यूपीएससीआधी अनेक स्पर्धा परीक्षा दिला. त्यांना सीडीएस, सीपीएफ या परीक्षा दिल्या. त्यांनी राज्य PCS ची परीक्षादेखील दिली होती. यामध्ये ते १०वेळा अयशस्वी ठरले. परंतु त्यांनी हार मानली नाही. अवनीश हे एकूण १३ परीक्षांमध्ये नापास झाले होते. परंतु यामुळे त्यांची जिद्द काही कमी झाली नाही.

अवनीश यांनी यूपीएससी परीक्षा दिली. पहिल्या प्रयत्नात ते इंटरव्ह्यूपर्यंत पोहचले पण यश मिळाले नाही. दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी ७७ रँक प्राप्त केली आणि त्यांनी आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

Success Story
Success Story: IAS व्हायचं म्हणून गावकऱ्यांनी खिल्ली उडवली, सुलोचना डगमगली नाही; हिम्मतीनं UPSC क्रॅक केली अन् कलेक्टर झाली, वाचा सक्सेस स्टोरी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com