Success Story: 12th फेल, खचले नाही, जिद्दीने क्रॅक केली UPSC; नाशिकचा लेक IPS झाला

Success Story of IPS Umesh Ganpat: आयपीएस उमेश गणपत यांनी तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली आहे.ते १२वीच्या परीक्षेत इंग्रजी विषयात नापास झाले होते.
Success Story
Success StorySaam Tv
Published On
Summary

IPS उमेश गणपत यांचा प्रेरणादायी प्रवास

तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी पास

१२वीत झाले होते नापास

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षांपैकी एक आहे. यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. दरम्यान, परिस्थिती कशीही असली तरी त्यावर मात करता यायला हवी. तुम्ही प्रयत्न केले तर अपयशाला यशात बदलू शकतात. यासाठी फक्त इच्छाशक्ती लागते. असंच काहीसं आयपीएस उमेश गणपत यांनी केलं.

Success Story
Success Story: ठाण्याचा लेक झाला IPS; २२व्या वर्षी क्रॅक केली UPSC; अभिजित पाटील यांचा प्रवास

उमेश गणपत हे एकेकाळी १२वीच्या परीक्षेत नापास झाले होते. ते लहानपणी शाळा सोडून सायकलवर दूध विकायला जायचे. त्यांना अनेक नकार पचवायला लागले. त्यांच्या आयुष्यात खूप अडचणी आल्या परंतु त्यांनी नशीब बदलण्याचा निर्णय घेतला.

उमेश गणपत हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील रहिवासी आहे. त्यांचे वडील शेती करायचे. त्यांच्या कुटुंबात पशुपालन करायचे. त्यातून येणाऱ्या दूध उत्पन्नातून पैसे मिळवायचे. त्याच पैशातून कुटुंबाचे पालनपोषण व्हायचे.

दूध विकायला जायचे

उमेश गणपत हे २००१ मध्ये बोर्डिंग शाळेत शिकायचे. त्यांनी १०वी पास केली परंतु १२वीत इंग्रजी विषयात नापास झाले. त्यामुळे त्यांनी बोर्डिंग स्कूल सोडले. उमेश यांनी शाळा सोडल्यानंतर ते शेती आणि दूध विकण्यासाठी कुटुंबाला मदत करायचे. ते दूध जमा करुन नाशिकच्या बाजारात जायचे.

नाशिकला जाताना त्यांनी विद्यापीठात विद्यार्थ्यांना शिकताना पाहिले. त्यावेळी त्यांनी यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटीमध्ये अॅडमिशन घेतले. त्यांनी २००५ मध्ये १२वी पास केली. यानंतर पुणे विद्यापीठात बीए, BEd आणि MAसाठी अॅडमिशन घेतले.

Success Story
Success Story : असंख्य स्वप्नांची पूर्तता, शेतकऱ्याच्या लेकीच्या यशाने सोलापुरात आनंदोत्सव, वाचा डॉ. गौरी झोळ यांचा संघर्षमय प्रवास

यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. यासाठी ते दिल्लीला गेले. त्यांना २०१२ आणि २०१३ मध्ये यूपीएससी परीक्षेत अपयश मिळाले. परंतु त्यांना हार मानली नाही. त्यांनी तिसऱ्या प्रयत्नानत यूपीएससी परीक्षा पास केली आणि आयपीएस पदाला गवसणी घातली.

Success Story
Success Story: वडिलांच्या वर्दीकडे पाहून प्रेरणा मिळाली, थेट आयएपीस झाला; अभिनव शर्मा यांचा यशस्वी प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com