Accident News : राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा थरार! उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, एकाचा जागीच मृत्यू

Sangli Peth National Highway Accident News : सांगली ते पेठ महामार्गावर रिफ्लेक्टर व पार्किंग लाईट नसलेल्या ट्रकला दुचाकीची धडक बसून एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी. अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रकची केबिन पेटवली; पोलिसांकडून तपास सुरू.
Accident News : राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा थरार! उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, एकाचा जागीच मृत्यू
Sangli Peth National Highway Accident Newssaam tv
Published On
Summary
  • रिफ्लेक्टर व पार्किंग लाईट नसलेल्या ट्रकवर दुचाकीची धडक

  • शिवकुमार पाटील जागीच ठार; दुसरा युवक गंभीर जखमी

  • अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रकची केबिन जाळली

  • पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला

विजय पाटील, सांगली

सांगली ते पेठ या राष्ट्रीय महामार्गावर नियम धाब्यावर बसवून धोकादायक स्थितीत लावलेल्या ट्रकला दुचाकीची धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार शिवकुमार श्रीकांत पाटील हा जागीच ठार झाला. तर मागे बसलेला यशवंत वसंत पाटील हा गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला. त्यामध्ये ट्रकची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली.

ढवळी येथील शिवकुमार पाटील व त्याचा मित्र यशवंत पाटील हे दोघेजण रात्री दुचाकीवरून गावाकडे जात होते. तुंग येथील नर्सरीसमोर रात्री साडे नऊच्या सुमारास ट्रक आष्ट्याकडे तोंड करून थांबला होता. ट्रक रस्त्याकडेला उभा केल्यानंतर दिशादर्शक फलक आणि रिफ्लेक्टरही लावलेला नव्हता. तसेच पार्किंग लाईट न लावल्यामुळे तो धोकादायक स्थितीत उभा होता. त्याचवेळी शिवकुमार याला अंधारात थांबलेला ट्रक दिसला नाही.

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा थरार! उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, एकाचा जागीच मृत्यू
Sambhajinagar Crime : मुंबई, पुण्यानंतर घोटाळ्याचं लोण संभाजीनगरात, १५० जणांना TWJ कंपनीने कोट्यवधीला गंडवलं, वाचा घटनाक्रम

दुचाकी ट्रकवर आदळल्यानंतर शिवकुमार याच्या डोक्याला, कपाळाला मार लागून गंभीर जखमी होऊन निपचिप पडला. तर मागे बसलेला यशवंत पाटील जखमी झाला. डॉक्टरांनी घटनास्थळी तपासल्यानंतर शिवकुमार हा मृत असल्याचे समजले. यशवंतला आष्टा येथे उपचारास नेले. सांगली ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली.

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा थरार! उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, एकाचा जागीच मृत्यू
Sambhajinagar News : ७ वर्षांच्या मुलीवर सावत्र वडिलांकडून लैंगिक अत्याचार, सख्ख्या आईनेच केली मदत; संभाजीनगरमध्ये खळबळ

पोलिसांनी गर्दी हटवून पंचनामा केला. शिवकुमारचा मृतदेह सिव्हील हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला. ट्रक चालकाने रिफ्लेक्टर तसेच पार्किंग लाईट न लावल्यामुळे अपघात झाल्याचे दिसून आले. त्यामुळे संतप्त जमावाने ट्रकची तोडफोड करत केबिन पेटवून दिली. त्यामुळे काही वेळातच केबिन जळून खाक झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com