Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर थरारक घटना; मुंबईला जाताना धावत्या कारमध्ये पत्नीची हत्या, त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये पोहचला अन्...

Samruddhi Mahamarg wife murder latest news : समृद्धी महामार्गावर धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नागपूरहून मुंबईकडे जाताना पतीने चालत्या कारमध्ये पत्नीची कथित हत्या केल्याचा आरोप आहे.
Samruddhi Mahamarg latest news
Samruddhi Mahamarg latest news साम टीव्ही मराठी
Published On

मनौज जैस्वाल|वाशिम प्रतिनिधी|साम टीव्ही मराठी

Samruddhi Mahamarg Crime News : समृद्धी महामार्गावर एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. नागपूरहून मुंबईच्या दिशेने जात असताना एका पतीने चालत्या कारमध्ये पत्नीची हत्या केली. धक्कादायक म्हणजे, हत्येनंतर पतीने पत्नीचा मृतदेह कारमध्येच ठेवून अनेक किलोमीटरचा प्रवास केला आणि थेट वाशीमच्या कारंजा पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. या घटनेमुळे पोलीस प्रशासनासह संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर (कलवर्धा) भागात राहणारा सलमान खान नेक खान (वय ३० वर्षे) हा त्याची पत्नी हसीना बानो (वय २८ वर्षे) आणि तीन चिमुरड्या मुलांसह बलेनो कारने प्रवासाला निघाला होता. नागपूरवरून समृद्धी महामार्गाने मुंबईकडे जात असताना, वाटेत पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून जोरदार वाद झाला.

Samruddhi Mahamarg latest news
नाशिक हादरलं! छेडछाडीचा जाब विचारला म्हणून पर्यटकांवर जीवघेणा हल्ला; १५ किमी पाठलाग करून...

हा वाद इतका विकोपाला गेला की, निर्दयी पतीने कार चालवत असतानाच पत्नीच्या डोक्यात वार केले आणि नंतर गळा दाबून तिची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर मागच्या सीटवर मुले रडत असतानाच, पतीने पत्नीचा मृतदेह कारमध्ये ठेवून अनेक किलोमीटरचा प्रवास केला आणि थेट कारंजा शहर पोलीस स्टेशन गाठले. तिथे जात त्याने "मी पत्नीचा खून केला आहे," अशी कबुली दिली.

Samruddhi Mahamarg latest news
मंगळवारी उघडणार भाग्याचं कुलूप! सूर्य-चंद्र आणि बुधाची कमाल; 'या' भाग्यवान राशींना मिळणार बंपर पैसा

पोलिसांकडून तपास सुरू

पतीने स्वतःहून गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर कारंजा पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेतले असून कारमधून मृतदेह बाहेर काढला आहे. ही हत्या समृद्धी महामार्गावर नेमकी कुठे, कशी आणि कोणत्या कारणावरून झाली, याचा सखोल तपास कारंजा पोलीस करत आहेत.

Samruddhi Mahamarg latest news
Fact Check : तुमच्या स्मार्ट मीटरमध्ये कॅमेरा लावलाय का? व्हायरल मेसेजमागचं सत्य आले समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com