नाशिक हादरलं! छेडछाडीचा जाब विचारला म्हणून पर्यटकांवर जीवघेणा हल्ला; १५ किमी पाठलाग करून...

Nashik Crime News : नाशिकच्या इगतपुरीजवळील भावली धबधब्यावर पर्यटनासाठी गेलेल्या कुटुंबावर स्थानिक टवाळखोरांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. तरुणीच्या छेडछाडीला विरोध केल्यानंतर १५ किलोमीटर पाठलाग करून कारची तोडफोड करण्यात आली.
Bhavali Waterfall Attack
Bhavali Waterfall Attack Saam TV Marathi
Published On

Bhavali Waterfall Attack : पावसाळ्यात कुटुंबासोबत फिरायला जायचा प्लान करत असाल तर आताच सावध व्हा.. नाशिकमध्ये पर्यटनाला जाणाऱ्या कुटुंबाला बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना घडली आहे. इगतपुरीजवळील भावली धबधब्यावर पर्यटनासाठी गेलेल्या एका कुटुंबावर स्थानिक टवाळखोरांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे.

तरुणीची छेड काढल्याचा जाब विचारल्यामुळे चिडलेल्या टवाळखोरांनी या कुटुंबाचा १५ किलोमीटरपर्यंत थरारक पाठलाग करत ठिकठिकाणी हल्ले केले. लाकडी दांडे आणि लोखंडी रॉडने केलेल्या या भ्याड हल्ल्यात पर्यटकांच्या गाडीची प्रचंड तोडफोड करण्यात आली. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखून गाडी पळवल्यामुळे या कुटुंबाचा जीव थोडक्यात वाचला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेचा थरारक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या अंबड परिसरातील रहिवासी पुनम भागवत या आपल्या कुटुंबासह वीकेंडला निसर्गरम्य भावली धरणावर पर्यटनासाठी गेल्या होत्या. संपूर्ण कुटुंब धबधब्याचा आनंद घेत असताना तिथल्या काही स्थानिक टवाळखोरांनी कुटुंबातील एका तरुणीची छेड काढली. या छेडछाडीला भागवत कुटुंबाने कडाडून विरोध केला आणि टवाळखोरांना जाब विचारला. यावरून दोन्ही बाजूंमध्ये जोरदार वाद झाला.

Bhavali Waterfall Attack
क्रूरतेचा कळस! पोलीस कॉन्स्टेबलने पत्नीची केली निर्घृण हत्या, भररस्त्यात स्कुटीवर कडाक्याचं भांडण, २ मिनिटांत घेतला जीव

हा वाद एवढ्यावरच थांबला नाही, तर पर्यटकांनी तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला असता, चिडलेल्या टवाळखोरांनी टोळी जमवून या कुटुंबाचा पाठलाग सुरू केला. हल्लेखोरांनी हातात लाकडी दांडे आणि लोखंडी रॉड घेऊन भागवत यांच्या गाडीचा (कारचा) तब्बल १५ किलोमीटरपर्यंत थरारक पाठलाग केला. टवाळखोरांनी केवळ पाठलाग केला नाही, तर रस्त्यात ठिकठिकाणी गाडी अडवून कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

Bhavali Waterfall Attack
Accident : काळाचा क्रूर घाला! लग्नाला अवघे ६ दिवस झाले अन् सासरहून माहेरी जाताना जागीच मृत्यू; लग्नघर शोकाकुल

या भयंकर प्रसंगानंतर पीडित कुटुंबाने थेट नाशिक गाठले आणि या घटनेप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात पहिली तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा ग्रामीण भागाच्या हद्दीत घडल्यामुळे आता अंबड पोलीस आणि नाशिक ग्रामीण पोलीस यांच्याकडून संयुक्तपणे पथके तयार करून आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे पर्यटन स्थळांवरील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Bhavali Waterfall Attack
पीडित मुलीसह एका रात्री ६ जणांना क्रूरपणे संपवणाऱ्या आरोपीचाही मृत्यू, त्या ६० तासांत नेमकं काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com