क्रूरतेचा कळस! पोलीस कॉन्स्टेबलने पत्नीची केली निर्घृण हत्या, भररस्त्यात स्कुटीवर कडाक्याचं भांडण, २ मिनिटांत घेतला जीव

Delhi Police Crime News : दिल्लीतील कल्याणपुरी परिसरात एका पोलीस कॉन्स्टेबलने पत्नीची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Delhi Police Crime News
Delhi Police Crime NewsSaam TV
Published On

Delhi Constable Shoots Wife : राजधानी दिल्लीतील कल्याणपुरी परिसरातून खाकी वर्दीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी आर्ध्या रात्री स्कूटीवर नवरा-बायकोमध्ये सुरू झालेल्या किरकोळ वाद थेट हत्याकांडात बदलला. दिल्ली पोलिसांच्या एएटीएस (AATS) टीममध्ये तैनात असलेल्या एका कॉन्स्टेबल पतीने अवघ्या २ मिनिटांत आपल्याच पत्नीची भररस्त्यात गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. धक्कादायक म्हणजे, मृत प्रियंकाचा कालच वाढदिवस होता, पण वाढदिवसाच्या काही तासांतच पतीने तिची क्रूरतेने हत्या केली. या थरारक घटनेने संपूर्ण दिल्ली हादरली असून पोलीस आरोपी पतीचा कसून शोध घेत आहेत.

पूर्व दिल्लीतील कल्याणपुरी परिसरात पोलीस अधिकाऱ्याने आपल्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. मृत महिलेचे नाव प्रियांका (३४) होते. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करण्यात येत आहे. आरोपीचे नाव मनीष भाटी असे असून तो दिल्ली पोलिसात हवालदार आहे.

Delhi Police Crime News
क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२-१३ जुलैच्या मध्यरात्री ३ वाजता कल्याणपुरी पोलिसांना रस्त्यावर एका महिलेचा मृतदेह पडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तात्काळ जखमी असलेल्या त्या महिलेला लाल बहादूर शास्त्री रुग्णालयात नेण्यात आले होते. ते तिथे पोहोचले तेव्हा तिला मृत घोषित करण्यात आले.

Delhi Police Crime News
पत्नीवर गावठी कट्ट्यातून तीन राऊंड गोळीबार; आरोपी पती फरार, नांदेड हादरले

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपास केल्यावर असे आढळून आले की, एका डिलिव्हरी बॉयने रस्त्यावर पडलेला मृतदेह पाहिला होता. त्याने त्या महिलेला रुग्णालयात नेले होते. त्या महिलेची ओळख ईस्ट विनय नगर येथील रहिवासी प्रियांका अशी पटली. आदल्या दिवशी प्रियांकाचा वाढदिवस होता, पण तिच्या पतीने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या नव्हत्या. प्रियांकाने ही गोष्ट तिच्या वडिलांना सांगितली होती. तिचा मृतदेह सापडलेली जागा त्यांच्या घरापासून अगदी काही पावलांवरच होती. त्यांच्या लग्नाला फक्त तीन वर्षे झाली होती. दरम्यान, प्रियांकाने मनीषविरुद्ध हुंडा छळाची तक्रार दाखल केली होती.

Delhi Police Crime News
क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन

तपासात असे उघड झाले की, काही वेळापूर्वीच प्रियंका तिचा पती मनीषसोबत स्कूटरवरून जाताना दिसली होती. वाटेत त्यांच्यात वाद झाला. आरोपीने पिस्तूल काढून महिलेच्या छातीत गोळी झाडली आणि घटनास्थळावरून पळून गेला. आरोपीने सरकारी शस्त्राने गुन्हा केला की दुसऱ्या कोणत्या शस्त्राने, हे त्याच्या अटकेनंतरच कळेल. हत्येमागील हेतू सध्या अस्पष्ट आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची काही पथके तैनात केली आहेत.

Delhi Police Crime News
पुणे हादरले! पत्नीची निर्घृण हत्या करून पतीनेही संपवले आयुष्य; कारण वाचून पायाखालील जमीन सरकेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com