Telangana six murder accused found dead : दोन कुटुंबांतील ६ जणांची एका रात्री अत्यंत निर्घृणपणे हत्या करून संपूर्ण तेलंगणा हादरवून सोडणाऱ्या त्या नराधमाचा थरारक अंत झाला आहे. पोकसो (POCSO) गुन्ह्यातील आरोपी आणि ६ जणांचा मारेकरी असलेल्या या गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांनी तब्बल ६० तासांची महाशोध मोहीम (Manhunt) राबवली होती. शेकडो पोलीस, ड्रोन कॅमेरे आणि शोधक श्वानांच्या मदतीने जंगलात राबवलेल्या या ६० तासांच्या थरारानंतर पोलिसांना त्या नराधमाचा मृतदेह पोलिसांना मिळाला.
३ मुलांसह सहा जणांच्या हत्येप्रकरणी फरार असलेल्या पॉक्सो कायद्यातील आरोपी राज कुमारचा ६० तास शोध घेतल्यानंतर सोमवारी दुपारी रंगारेड्डी जिल्ह्यातील कोथूर मंडलांतर्गत असलेल्या पांजरला गावात पोलिसांना मृतदेह सापडला. फ्युचर सिटीचे पोलीस आयुक्त तरुण जोशी यांनी याल दुजोरा दिला आहे. राज कुमारच्या मृतदेहाजवळ कीटकनाशकाची बाटली पडलेली आढळल्याने, त्याने आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.
पोलीस राज कुमारचा सर्वत्र शोध घेत होते, पण त्यांच्या हाती कोणताही सुगावा लागला नव्हता. त्याच वेळी त्यांना एका स्थानिक गावकऱ्याने डायल-100 वर फोन करून एका रिअल इस्टेट प्रकल्पात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह पडल्याची माहिती दिली. स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी मृतदेह पाहिल्यानंतर धक्काच बसला.
शुक्रवारी रात्री, राज कुमार कथितरित्या एका १६ वर्षीय मुलीच्या घरी गेला. त्या मुलीच्या कुटुंबीयांनी मे महिन्यात त्याच्याविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी सांगितले की, त्याने मुलीची आई आणि आजी यांची हत्या केली. त्या किशोरवयीन मुलीला जबरदस्तीने आपल्या गाडीतून घेऊन गेला. त्याने त्या मुलीला जवळच्या तलावावर नेले आणि चाकूने वार करून हत्या केली. तो स्वतःच्या घरी परतल्यानंतरही पत्नी आणि दोन लहान मुलांची हत्या केल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी सांगितले की, राज कुमारने नंतर त्याच्या वडिलांना फोन करून, आपण सहा जणांना ठार केल्याची माहिती दिली आणि आपणही आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने आपला मोबाईल फोन बंद केला. सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पांजरला गावातील एका रिअल इस्टेट प्रकल्पामध्ये उंच गवतात त्याचा मृतदेह आढळून आला. मृत्यूचे नेमके कारण समोर आले नाही. पोलिसांनी पंचनामा करून राज याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.