Shocking : प्रेमाचा दुर्दैवी शेवट! सोशल मीडियावर प्रेम जडलं, ६ महिने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिले; नंतर गर्लफ्रेंडची हत्या

Bengaluru Murder Crime News : बंगळुरूमधील मल्लेश्वरम परिसरात २० वर्षीय तरुणीची तिच्या लिव्ह-इन पार्टनरने हत्या केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली असून तपास सुरू आहे.
BENGALURU LIVE-IN PARTNER MURDER CASE | 20-YEAR-OLD WOMAN KILLED, ACCUSED ARRESTED
BENGALURU LIVE-IN PARTNER MURDER CASE | 20-YEAR-OLD WOMAN KILLED, ACCUSED ARRESTEDSaam tv
Published On
Summary
  • बंगळुरूमध्ये 20 वर्षीय तरुणीची हत्या

  • लिव्ह-इन पार्टनरने केली हत्या

  • इंस्टग्रामवर झाली होती ओळख

  • पोलिसांनी आरोपीला केली अटक

Bengaluru Live In Partner Murder News बंगळुरूमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील मल्लेश्वरम परिसरात एका २७ वर्षीय तरुणाने आपल्या २० वर्षीय लिव्ह-इन पार्टनरची गळा दाबून हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेने मृत मुलीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोघांची ओळख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर झाली होती.आरोपी शरत हा शहरात पाण्याचा टँकर चालवण्याचे काम करत होता. बराच काळ झालेल्या संवादानंतर दोघांमध्ये मैत्रीपलीकडचं नातं निर्माण झालं होतं. दोघेही लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. मृत तरुणीची ओळख अनुषा (वय २०) अशी असून आरोपीचे नाव शरत (वय २७) असे आहे.

BENGALURU LIVE-IN PARTNER MURDER CASE | 20-YEAR-OLD WOMAN KILLED, ACCUSED ARRESTED
Monsoon Update : उकाड्याने नागरिक हैराण! मान्सून संपूर्ण महाराष्ट्र कधी व्यापणार? हवामान विभागाचा वर्तवला अंदाज

दोघेही कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील सकलेशपूर येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री दोघांमध्ये वैयक्तिक कारणावरून वाद झाला. सुरुवातीला किरकोळ असलेला हा वाद हळूहळू तीव्र होत गेला. रागाच्या भरात शरतने अनुषाचा गळा दाबल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, ही घटना घडल्यानंतर तब्बल दोन दिवस आरोपीने शिताफीने सगळ्यांपासून ही बाब लपवून ठेवली. सोमवारी आरोपीने स्वतःच्या एका वकिलाला या घटनेबाबत माहिती दिली. शरतच्या कबुलीनंतर संबंधित वकिलाने तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली.

BENGALURU LIVE-IN PARTNER MURDER CASE | 20-YEAR-OLD WOMAN KILLED, ACCUSED ARRESTED
Shocking: "मी ईश्वराचा अवतार..." म्हणत जाळ्यात ओढलं, IT कंपनीतील महिला मॅनेजरवर सलग २५ वर्ष अत्याचार

यानंतर शेषाद्रीपुरम पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक पुरावे गोळा केले. त्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अनुषाचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. सध्या आरोपी शरत पोलीस कोठडीत असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. नेमका वाद कशामुळे झाला आणि या प्रकरणामागील इतर कोणते कारण होते का, याचा तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com