Fact Check : तुमच्या स्मार्ट मीटरमध्ये कॅमेरा लावलाय का? व्हायरल मेसेजमागचं सत्य आले समोर

Smart meter fact check : स्मार्ट मीटरमध्ये कॅमेरा बसवण्यात आल्याचा व्हायरल दावा खोटा ठरला आहे. महावितरणने स्पष्ट केले की मीटरवरील लाल दिवा हा केवळ Impulse LED इंडिकेटर असून तो वीज वापराची नोंद करण्यासाठी असतो.
Fact Check
Fact Check
Published On

संदीप चव्हाण, साम टीव्ही प्रतिनिधी

स्मार्ट मीटरमध्ये कॅमेरा लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. होय, असा व्हिडिओही व्हायरल करण्यात आलाय. पण, खरंच स्मार्ट मीटरमध्ये कॅमेरा लावलाय का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात.

या फोटोमध्ये पाहा...या फोटोत स्मार्ट मीटर दाखवण्यात आलाय...आणि त्यामध्ये कॅमेरा असल्याचा दावा करण्यात आलाय...स्मार्ट मीटरमध्ये काहीतरी कॅमेरा सारखंच दिसतंय...त्यामुळे हा कॅमेरा असल्याचा दावा करण्यात आलाय...हा फोटो आणि मेसेज व्हायरल होतोय...त्यामुळे आता संभ्रम निर्माण झालाय...खरंच स्मार्ट मीटरमध्ये कॅमेरा लावलाय का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

तुमच्या घरी आता लावला जात असलेल्या स्मार्ट मीटरमध्ये कॅमेरा लावण्यात आलाय.

Fact Check
Fact Check: जांभळाचा सडा म्हणजे यंदा दुष्काळ पडणार? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

हा मेसेज आता व्हायरल होतोय...कारण, स्मार्ट मीटर लावण्याची प्रक्रिया जोरदार सुरू आहे...त्यातच आता असा मेसेज व्हायरल होत असल्याने संभ्रम निर्माण झालाय...स्मार्ट मीटरमध्ये कॅमेरा लावण्यात आलाय तर तो कशासाठी असा अनेकांनी प्रश्न उपस्थित केलाय...त्यामुळे खरंच स्मार्ट मीटरमध्ये कॅमेरा लावलाय का...? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...? आम्ही थेट महावितरणचे जनसंपर्क अधिकाऱ्यांची भेट घेतली...आणि त्यांच्याकडून या स्मार्ट मीटरसंदर्भात माहिती जाणून घेतली...

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

स्मार्ट मीटरमध्ये कोणताही कॅमेरा लावलेला नाही

मीटर वीज वापराची नोंद आणि बिलिंगसाठीच

मीटरवरील लाल एलईडी हा फक्त इंडिकेटर

Fact Check
Pune: परवानगीशिवाय स्मार्ट मीटर लावाल तर गाठ माझ्याशी... पुणेकर वकिलाचा वीज कंपन्यांना 'पुणेरी' स्टाईलने कडक इशारा

स्मार्ट मीटरमध्ये ज्या भागाला कॅमेरा म्हटलं जातंय. तो प्रत्यक्षात 'Impulse LED' आहे...तुम्ही किती वीज वापरत आहात, त्यानुसार हा दिवा लुकलुकतो...वीज युनिटची अचूक गणना करण्यासाठी आणि मीटर व्यवस्थित सुरू आहे की नाही, हे पाहण्यासाठी हा इंडिकेटर दिलेला असतो...त्यामुळे स्मार्ट मीटर कसा काम करतो तेही पाहुयात...

स्मार्ट मीटर कसा काम करतो?

स्मार्ट मीटर एक कम्युनिकेशन मॉड्युल असते

हे मॉड्युल मोबाईल टॉवरप्रमाणे काम करतं

वीजेचा डेटा महिन्याला कंपनीच्या सर्व्हरला पाठवते

वीज कर्मचाऱ्यांना रीडिंगसाठी घरी यावं लागणार नाही

त्यामुळे आमच्या पडताळणीत स्मार्ट मीटरमध्ये कॅमेरा लावण्यात आल्याचा दावा असत्य ठरलाय...अशा मेसेजवर तुम्ही विश्वास ठेवू नका...असे मेसेज व्हायरल करून दिशाभूल केली जातेय...माधव सावरगावे साम टीव्ही संभाजीनगर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com