Samruddhi Mahamarg Theft News: समृद्धी महामार्गावर अपघातानंतर चोरट्यांचा सुळसुळाट; लाखोंचा मुद्देमाल लंपास

Samruddhi Mahamarg Crime News: अपघाताच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांच्या मनात भीती बसली असून अनेक जण या महामार्गाने प्रवास करणे टाळतायत.
Samruddhi Mahamarg Theft News
Samruddhi Mahamarg Theft NewsSaam TV
Published On: 

संजय जाधव

Samruddhi Mahamarg News:

समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. वाहनांची वेग मर्यादा न पाळल्याने तसेत टायर फुटल्याने आतापर्यंत अनेकांना या महामार्गावर आपला जीव गमवावा लागला आहे. अपघाताच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांच्या मनात भीती बसली असून अनेक जण या महामार्गाने प्रवास करणे टाळतायत. अशात आता समृद्धीवर चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. (Latest Crime News)

समृद्धी महामार्गाने प्रवास करताना चोरटे दुसऱ्यांच्या वाहनासमोर आपले वाहन आणून त्यांना थांबवत आहेत. तसेच त्यांच्याकडून पैसे, दागिने यांसह असलेला सर्व मुद्देमाल लंपास करतायत. या घटनांमुळे नागरिकांना समृद्धीवरुन प्रवास करणे आणखीनच कठीण झाले आहे.

Samruddhi Mahamarg Theft News
Mumbai Crime News : पोलिसालाच गंडवले; मुलाला रेल्वेत नोकरी देण्याची बतावणी, आरोपी ४ वर्षांनी अडकला 'जाळ्यात'

जालना जिल्ह्यातील बाबुराव फुके यांच्यासोबतही अशीच घटना घडली. मात्र पोलिसांच्या सतर्कतेने चोरीला गेलेली सर्व रक्कम परत मिळाली आहे. फुके आपल्या कारने छत्रपती संभाजी नगरकडे समृद्धी मार्गाने जात होते. यावेळी मेहकर टोलनाक्याजवळ पाठीमागून आलेल्या तीन आरोपींनी त्यांच्या कारसमोर आपली कार उभी केली.

नंतर चोरट्यांनी फुकेंना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडील १ लाख २० हजार रुपये रोख आणि मोबाईल असा मुद्देमाल चोरी केला. याप्रकरणी २४ ऑगस्ट रोजी मेहकर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यावरून पोलिसांनी तांत्रिक दृष्ट्या तपास करून अनुक्रमे जालना व छत्रपती संभाजी नगर येथील गजानन, अनिल, राजेश यांना पोलिसांनी अटक केलीये.

Samruddhi Mahamarg Theft News
Samruddhi Highway: धक्कादायक! समृद्धी महामार्गावर अपघातांना निमंत्रण, मेहकरमधील एका हॉटेलने प्रशासनाची उडवली झोप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.