Mumbai Crime News : पोलिसालाच गंडवले; मुलाला रेल्वेत नोकरी देण्याची बतावणी, आरोपी ४ वर्षांनी अडकला 'जाळ्यात'

Mumbai News : रेल्वेत मुलाला कनिष्ठ अभियंतापदावर नोकरी देतो असे प्रलोभन दाखवून तरुणाने पोलिसाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Mumbai Crime News
Mumbai Crime News Saam Tv
Published On

Mumbai Crime News In Marathi : रेल्वेत मुलाला कनिष्ठ अभियंतापदावर नोकरी देतो असे प्रलोभन दाखवून तरुणाने पोलिसाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोल्हापूरच्या तरुणाला पोलिसांनी मुंबईत अटक केली आहे. आरोपीने त्यांच्याकडून ५ लाख रुपये घेतले होते.

३८ वर्षीय आरोपीला तब्बल ४ वर्षांनी पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. केंद्र सरकारच्या इंटरऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीमच्या मदतीने आर्थर रोड तुरुंगात आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

Mumbai Crime News
Navi Mumbai: खारघरजवळील पांडवकडा धबधब्यावर गेलेल्या १३ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू

गामदेवी पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद कांबळे असे आरोपीचे नाव आहे. आरोपीवर अजून एक गुन्हा दाखल आहे. आरोपीने याआधी नागपाडा येथील एका डॉक्टरची ६५ लाख रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणातही पोलीस आरोपीचा शोध घेत होते.

या प्रकरणात हवालदार तानाजी मोहिते यांची फसवणूक झाली आहे. ते डीबी पोलीस ठाण्यात तैनात कार्यरत असताना ही फसवणूक झाली. त्यांच्या घराजवळच प्रसाद कांबळे राहत होता. तेव्हा दोघांची भेट झाली होती. नोव्हेंबर २०१७ मध्ये आरोपी कांबळेने तानाजी यांना दक्षिण मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये बोलावले होते.

Mumbai Crime News
Senate Election : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक स्थगितीला आव्हान, उच्च न्यायालयात याचिका दाखल

कांबळेने तानाजी यांना त्यांच्या मुलाबद्दल विचारले. तेव्हा तानाजी यांनी सांगितले की, माझा मुलगा इंजीनिअर आहे. तो नोकरी शोधत आहे. तेव्हा कांबळेने त्यांना माझी मंत्रालयात आणि रेल्वेत ओळख आहे. मी तुमच्या मुलाला रेल्वेत नोकरी मिळवून देईन, अशी बतावणी केली.

काही दिवसांनी कांबळे याने पुन्हा तानाजी यांच्याशी संपर्क साधला. तुमच्या मुलाला नोकरी मिळवून देण्यासाठी ५ लाख रुपये लागतील असे सांगितले. त्यानंतर तानाजी यांनी ३ लाख रुपयांचा चेक आणि २ लाखांची रोकड दिली.

पैसे घेतल्यानंतर आरोपीने त्यांच्याशी संपर्क करणे बंद केले. आरोपीकडून तानाजी यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जाऊ लागली. यानंतर आरोपीने तानाजी यांचा नंबरदेखील ब्लॉक केला. चौकशीदरम्यान, आरोपी कांबळे त्याच्या राहत्या घरी कोल्हापूरला गेल्याचे त्यांना समजले. त्यानंतर तानाजी यांनी कोल्हापूर गाठले. शोध घेण्यास सुरुवात केली, असे तानाजी यांनी सांगितले.

Mumbai Crime News
Cyber Fraud News: सायबर चोरट्यांचा प्रताप! देवदर्शनाच्या नावाखाली भाविकांची फसवणूक; प्रकरण काय?

कोल्हापूरातील चौकशीदरम्यान त्यांना समजले की, आरोपी कांबळेने अनेकांची फसवणूक केली आहे. त्याच्या नवीन नंबरवरही त्यांनी फोन केला. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. यानंतर पोलीस हवालदार तानाजी यांनी गामदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कांबळेने तीन साथीदारांच्या मदतीने २०१७ मध्ये नागपाडा येथील डॉक्टरांकडून मुलीला केईएम रुग्णालयात एमडीसाठी जागा मिळवून देण्यासाठी ६५ लाख रुपये घेतले होते.

या महिन्याच्या सुरुवातीला आरोपीला अटक करण्यात आली आहे. 'आम्ही खूप दिवसांपासून आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करत होतो. नुकतीच आम्ही ICJS पोर्टलवर बघितले असता, आरोपी आर्थर रोड तुरूगांत असल्याचे समजले, असं पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com