Senate Election : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक स्थगितीला आव्हान, उच्च न्यायालयात याचिका दाखल

High Court News : मुंबई विद्यापीठाच्या पदवीधरांमधून निवडून येणाऱ्या १० जागांसाठीची निवडणूक ९ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली होती.
Mumbai High Court
Mumbai High CourtSaam TV
Published On

सचिन गाड

Mumbai News : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित करण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते ॲड. सागर देवरे यांनी ही याचिका दाखल केली. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्याची कृती बेकायदेशीर असल्याचं देवरे यांनी म्हटलं आहे.

मुंबई विद्यापीठाच्या पदवीधरांमधून निवडून येणाऱ्या १० जागांसाठीची निवडणूक ९ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली होती. सदरची १० सप्टेंबर रोजीची प्रस्तावित निवडणूक अचानकपणे राजकीय दबावापोटी १७ ऑगस्ट रोजी मुंबई विद्यापीठाने स्थगित केली, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. (Latest Marathi News)

Mumbai High Court
Navi Mumbai Crime News: वाशीमध्ये १५ वर्षांच्या मुलावर रिक्षाचालकाकडून लैंगिक अत्याचार, घटनेने नवी मुंबई हादरली

जाहीर झालेली निवडणूक स्थगित करण्याची मुंबई विद्यापीठाची कृती बेकायदेशीर असून सदर निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान देण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील विद्यापीठांच्या निवडणूका 'एकरूप परिनियम २०१७' व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील तरतूदी नुसारच घेतल्या पाहिजे. (Political News)

Mumbai High Court
Pune Ganeshotsav 2023 : पुण्यात गणोशोत्सव काळात मेट्रो रात्री 12 वाजेपर्यंत सुरु राहणार, अजित पवारांची माहिती

तसेच एकदा जाहीर झालेला निवडणूक कार्यक्रम स्थगित करता येत नाही, असा नियम असताना देखील राजकिय दबावापोटी मुंबई विद्यापीठाने निवडणूक रद्द केली. त्यामुळे मुंबई विद्यापीठाची ही कृती बेकायदेशीर असून मुंबई विद्यापीठाने निवडणूक स्थगित करण्यासंदर्भात १७ ऑगस्ट रोजी जाहीर केलेले परिपत्रक रद्द करून निवडणूक वेळेतच पूर्ण करण्यात यावी. या संदर्भात आदेश द्यावे अशी विनंती ॲड सागर देवरे यांनी याचिकेद्वारा केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com