Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कारने घेतला पेट, चालकामुळे अनर्थ टळला

Car Burnt at Samruddhi Highway: जालण्यातील समृद्धी महामार्गाच्या टोल नाका क्रमांक 2 जवळ ही घटना घडली.
Samruddhi Mahamarg Accident
Samruddhi Mahamarg Accidentsaam tv

Jalna News: स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरुच आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुण्याहून नागपूरकडे जात असलेल्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. जालण्यातील समृद्धी महामार्गाच्या टोल नाका क्रमांक 2 जवळ ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणताही जीवितहाणी झाली नाही.

Samruddhi Mahamarg Accident
kishori pednekar : किशोरी पेडणेकर यांना मोठा दिलासा; कथित SRA घोटाळ्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायलयाने दिले 'हे' निर्देश

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून नागपूरकडे जाणाऱ्या धावत्या कारणे अचानक पेट घेतला. परंतु चालकालाने प्रसंगावधान दाखवून कारवर ताबा मिळवला आणि कार रस्त्याच्या बाजूला उभा करून सहप्रवाशी असलेल्या दांपत्याला कारच्या खाली उतरवले. यामुळे कोणतीही जीवितहाणी झाली नाही. (Samruddhi Highway Accident)

Samruddhi Mahamarg Accident
IRS समीर वानखेडेंचंही ठाकरे गटावर तोंडसुख; सकाळी उठून प्रेस कॉन्फरन्स घेणारे कुठे आहेत? राऊतांना डिवचलं

यानंतर कारचालकाने संबंधित घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन विभागाच्या मदतीने या कारला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली घेतली आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com