

समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) अपघातांची मालिका सुरू झाली आहे. एक दिवसाआड या महामार्गावर अपघात (Samruddhi Mahamarg Accident) झाल्याच्या घटना समोर येत आहेत. अशामध्ये या महामार्गावर पुन्हा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. दीक्षाभूमीला (Dikshabhoomi) जाणाऱ्या अनुयायांच्या वाहनाला समृद्धी महामार्गावर अपघात झाला आहे. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंभोरा बोडखाजवळ ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीक्षाभूमीला जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांच्या वाहनाला समृद्धी महामार्गावर अपघात झाला. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंभोरा बोडखाजवळ पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातामध्ये १४ जण जखमी झालेत. अपघाताची माहिती मिळताच अमरावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ नजीकच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी नागपूरच्या दीक्षाभूमीला जात आहेत. बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली येथील काही अनुयायी पिकअपने दीक्षाभूमीला बाबासाहेबांना अभिवादनसाठी जात होते. त्याचवेळी समृद्धी महामार्गावरील निंभोरा बोडखाजवळ पिकअपला अपघात झाला. चालकाला झोप लागल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
या अपघातामध्ये अनेकांच्या पायाला, हाताला आणि डोक्याला दुखापत झाली आहे. यामधील काहींची प्रकृती गंभीर आहे. या अपघातामध्ये जखमी झालेल्यांमध्ये महिलांचा देखील समावेश आहे. जखमींवर सध्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या अपघाताचा तपास बुलडाणा पोलिसांकडून सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.