Pune Ganapati Festival 2023: मोहन भागवत यांच्या हस्ते दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठा; योगी आदित्यनाथही पुण्यात येणार?

Mohan Bhagwat Yogi Adityanath In Pune: गणपती उत्सवाच्या पहिल्याच दिवशी सरसंघचालक मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ पुण्यात येणार आहेत.
Mohan Bhagwat Yogi Adityanath In Pune:
Mohan Bhagwat Yogi Adityanath In Pune:Saamtv
Published On

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Pune Ganapati Festival 2023: गणेशोत्सव अवघा आठ दिवसांवर येऊन ठेपला असून सर्वत्र गणपती बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्टतर्फे यंदा अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. यंदा सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठा होणार असून योगी आदित्यनाथही पुण्यात येण्याची शक्यता आहे.

Mohan Bhagwat Yogi Adityanath In Pune:
Pune Crime News : पुण्यात बांगलादेशींवर पुन्हा कारवाई, 6 महिलांसह अल्पवयीन मुलगी पोलिसांच्या ताब्यात

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दरवर्षी प्रमाणे पुणे (Pune) शहरात गणपती बाप्पांच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. शहरातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ (Shrimant Dagadusheth Halwai Ganapati) ट्रस्टचा देखावा नेहमीच पुणेकरांना आकर्षित करत असतो.

यावर्षी श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई मंडळ ट्रस्ट यांच्यातर्फे अयोध्येतील श्रीराम मंदिर (Ram Mandir) साकारला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत ((Mohan Bhagwat) पुण्यात येणार आहेत. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही (Cm Yogi Adityanath) गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पुण्यात येण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या साठी 19 सप्टेंबरला सरसंघचालक पुण्यात असतील. तसेच त्यांच्यासोबत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच पुण्यातील गणेशोत्सवादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही पुण्यातील मानाच्या गणपतीचें दर्शन घेणार आहेत. (Latest Marathi News)

Mohan Bhagwat Yogi Adityanath In Pune:
Extramarital Affair: विवाहबाह्य संबंध करण्यापूर्वी करा विचार, नाहीतर गमवावी लागेल नोकरी; नियम काढणाऱ्या 'या' कंपनीची होतेय जगभरात चर्चा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com