Sambhaji Bhide: नेत्यांपासून जनतेपर्यंत सगळेच फालतू; संभाजी भिडे यांचे वादग्रस्त वक्तव्य

Sambhaji Bhide Controversial Statement : सांगलीत आज शिव प्रतिष्ठानच्यावतीने दुर्गामाता दौडचा समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Sambhaji Bhide
Sambhaji BhideSaam tv
Published On

Sangli News:

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. नेत्यांपासून जनतेपर्यंत सगळेच फालतू असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. सांगलीत आज शिव प्रतिष्ठानच्यावतीने दुर्गामाता दौडचा समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले.

संभाजी भिडे यांनी सांगितले की, नेत्यांपासून जनतेपर्यंत सगळेच फालतू आहेत. दसरा म्हणजे सीमोल्लंघनाचा प्रारंभ असून कर्तृत्व शून्य हिंदू समाजाला सीमोल्लंघनासाठी कटिबद्ध करण्यासाठी दुर्गामाता दौड असल्याचे मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केले आहे. नवरात्रीनिमित्ताने सांगलीमध्ये सुरू असलेल्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या दुर्गामाता दौडीची आज मोठ्या उत्साहात सांगता झाली. या कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sambhaji Bhide
Sangli Accident News : दसरा मेळाव्यासाठी निघालेल्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या कारला ट्रकची धडक; एक ठार, तिघे जखमी

नऊ दिवस सांगली शहरामध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहामध्ये दुर्गामाता दौड सुरू होती. तरुणांच्यामध्ये देशभक्ती आणि धर्माबद्दल जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ४० वर्षांपासून शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानकडून दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात येते. आज दसऱ्याच्या दिवशी दुर्गामाता दौडचा समारोप करण्यात आला.

Sambhaji Bhide
Gold Silver Price Today (24th October): दसऱ्याच्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ, सोनं खरेदीसाठी जाण्याआधी चेक करा लेटेस्ट दर

नवरात्राेत्सव सार्वत्रीकरित्या साजरा करण्यासाठी दुर्गामाता दाैडची संकल्पना संभाजी भिडे यांनी पुढे आणली. युवावर्गात हिंदू धर्माविषयी जागृती निर्माण करणे याबराेबरच युवकांचे संघटन करणे या हेतूने १९८३ पासून संभाजी भिडे यांनी सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून दुर्गामाता दौड सुरु केली. नवरात्रोत्सवाचे वातावरण आणि दुर्गामात दौड हे आता एक समीकरण झाले आहे. या निमित्ताने सांगली शहरात एकी निर्माण हाेते.

Sambhaji Bhide
Dussehra Melava 2023: दसरा मेळाव्यासाठी ७५ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १२५०० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात, वाहतुकीतही बदल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com