Nagpur : समृद्धी महामार्गावर ४० प्रवासी १० तास खोळंबले, नेमकं काय घडलं? वाचा

Nagpur Samruddhi Expressway News : समृद्धी महामार्गावर नागपूर-मुंबई जाणारी संजय ट्रॅव्हल्सची खासगी बस पहाटे बंद पडल्याने ४० प्रवासी तब्बल दहा तास अडकले. आरटीओच्या हस्तक्षेपानंतर पर्यायी बसची व्यवस्था करण्यात आली.
Nagpur : समृद्धी महामार्गावर ४० प्रवासी १० तास खोळंबले, नेमकं काय घडलं? वाचा
Nagpur NewsSaam Tv
Published On
Summary
  • समृद्धी महामार्गावर खासगी बस पहाटे बंद पडली

  • ४० प्रवासी दहा तास रस्त्यावर अडकले

  • बस मालकाने फोन बंद केल्याचा आरोप

  • RTO हस्तक्षेपानंतर पर्यायी बसची व्यवस्था

माधव सावरगावे, नागपूर

नागपूरहून मुंबईकडे जाणारी संजय ट्रॅव्हल्सची खासगी बस समृद्धी महामार्गावर हर्सूल टोल नाक्याजवळ शनिवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास अचानक बंद पडली. त्यामुळे बसमधील ४० प्रवाशांचे मोठे हाल झाले. रात्रभर थंडीत कुडकुडत आणि भीतीच्या छायेत प्रवाशांना रस्त्यावरच थांबावे लागले. महिला प्रवाशांची विशेष कुचंबना झाली असून, प्रवाशांना पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था उपलब्ध नव्हती.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरहून मुंबईकडे जाणारी संजय ट्रॅव्हल्सची खासगी बस (क्र. एमएच ४० सीटी- ४१७७) ही समृद्धी महामार्गावरील सावंगी टोलनाक्याच्या पुढे जावून बंदी पडली. चालकाने बस रस्त्याच्या कडेला आणून उभी करुन मालकाला माहिती दिली.

Nagpur : समृद्धी महामार्गावर ४० प्रवासी १० तास खोळंबले, नेमकं काय घडलं? वाचा
Shocking : बाहेरून दिसायचं भंगाराचं दुकान, आतमध्ये चालायचा भयंकर प्रकार; धाड पडली अन् आतील दृश्य चक्रावून टाकणारं...

मात्र मालकाने दुसरी बस सध्या उपलब्ध नसल्याचे सांगीतले. जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा बस येईल असे सांगून मालकाने फोन बंद करुन टाकला असे प्रवाशांनी सांगीतले. आता येईल, थोड्या वेळाने येईल असे करत पहाट झाली तरीही बस आलीच नाही. त्यामुळे प्रवाशी त्रस्त झाले होते. सकाळी घटनेची माहिती मिळताच प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी तातडीने भरारी पथक पाठवले.

Nagpur : समृद्धी महामार्गावर ४० प्रवासी १० तास खोळंबले, नेमकं काय घडलं? वाचा
Mulund Metro : मुंबईत मोठी दुर्घटना! मेट्रो पिलर स्लॅब थेट ऑटो अन् कारवर कोसळला, मलब्याखाली अनेकजण अडकले, एकाचा मृत्यू

मोटार वाहन निरीक्षक नम्रता शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांसाठी तातडीने पाण्याच्या बाटल्या, चहा व नाश्ताची व्यवस्था केली. तसेच ट्रॅव्हल्स चालकाला पर्यायी बस तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना देत कारवाईचा इशारा दिला. त्यानंतर मात्र घाबरलेल्या मालाकने दुपारी साडेबारा वाजता बस पाठवली. बस आल्यानंतर प्रवासी पुढील प्रवासासाठी रवाना झाले. जवळपास दहा तास अडकल्याने प्रवाशांत संताप व्यक्त होत होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com