समर्थकांनी शिवसेना भवन समाेर लावलेल्या 'त्या' बॅनरनंतर संभाजीराजे छत्रपती म्हणाले...

राज्यसभा निवडणुकी न लढविण्याचे स्पष्ट करताना संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द माेडल्याचे म्हटलं हाेते.
sambhajiraje chhatrapati
sambhajiraje chhatrapati Saam Tv

मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांनी दादर येथील शिवसेना भवनसमोर (shivsena bhavan) 'गनिमी कावा वापरून छत्रपतींचा अपमानचा बदला घेणाऱ्या सर्व आमदारांचे आभार' असा मजकूर लिहिला बॅनर लावला आहे. त्याची जाेरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. दरम्यान या बॅनरबाबत युवराज संभाजीराजे छत्रपती (yuvraj sambhajiraje chhatrapati) यांनी ट्विट करुन समर्थकांच्या प्रेमाचा आदर करतो. मात्र राजकारणात येणार असलो तरी 'स्वराज्य'ला तत्वांची बैठक असेल अशी भावना व्यक्त केली आहे. (sabhajiraje latest marathi news)

राज्यसभा निवडणुकीत (RajyaSabha Election) भाजपचे उमेदवार विजयी झाले. त्यातच धनंजय महाडिक यांच्याकडून सेनेच्या संजय पवारा यांचा पराभव झाला. त्यामुळे शिवसेनेला (shivsena) आता मराठा संघटना आणि संभाजीराजे छत्रपतींचे समर्थक टार्गेट करु लागलेत. आज समर्थकांनी बॅनरबाजी करुन मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

sambhajiraje chhatrapati
Udayanraje Bhosale: पुणे- सातारा- कराड रेल्वेची शटल सेवा सुरु करा : उदयनराजे भाेसले

दरम्यान समर्थकांनी माझ्या प्रेमापोटी जे फ्लेक्स लावले, त्यांच्या प्रेमाचा मी आदरच करतो. मात्र कोणत्याही पक्षाला खुन्नस म्हणून त्यांच्या कार्यालयासमोर अशी काही कृती करणे, हे माझ्या तत्वात बसत नाही. राजकारणात येणार असलो तरी 'स्वराज्य'ला तत्वांची बैठक असेल अशी भावना संभाजीराजेंनी ट्विट करुन व्यक्त केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

sambhajiraje chhatrapati
Pandharpur Wari: पायी वारीचं वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी येणार 'माऊली' गावात
sambhajiraje chhatrapati
सरकारचा माेठा निर्णय; रात्री दहा नंतर लग्न समारंभास बंदी; साडे आठला बाजारपेठ राहणार बंद?
sambhajiraje chhatrapati
प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा; तिघांना अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com