बुलढाणा : बुलढाणा (buldhana) जिल्ह्यातील लोणार (lonar) तालुक्यातील वझर येथील रामदास सरकटे याचा मृतदेह भूमराळा शिवरातील एका विहिरीत शुक्रवारी आढळून आला होता. सरकटे याचा खून झाल्याचा संशय पोलिसांना (police) आला हाेता. कसून तपास केल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. या प्रकरणी तिघांना अटक (arrest) करण्यात आल्याची माहिती पाेलीसांनी दिली. (buldhana crime news)
या घटनेनंतर पोलिसांनी तपास करताना सरकटे याच्या पत्नीला व त्यांच्या अल्पवयीन बालकास पोलिसी खाक्या दाखविला. त्यानंतर दाेघेही घडाघडा बाेलले. पाेलीसांच्या तपासात मृतक रामदास यांच्या पत्नीचे गावातीलच ज्ञानेश्वर आघाव यांचेशी अनैतिक संबंध होते. त्यावरुन सरकटे आणि पत्नीचे नेहमी भांडण होत असतं.
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा कायमचा काटा काढून टाकायचे असे ज्ञानेश्वर आघाव व संगीत सरकटे यांनी ठरवलं. दोघांनी मिळून रामदास सरकटे याचा आधी दोरीच्या साहाय्याने गळा आवळून खून केला. त्याचा मृतदहे विहिरीत फेकून दिला. या प्रकरणी ज्ञानेश्वर आघाव, संगीता सरकटे व अल्पवयीन मुलास अटक केल्याची माहिती पाेलीसांनी दिली.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.