Lok Sabha Election : मतदानासाठी १२५५ वाहनांची व्यवस्था; ३५२ बससाठी मोजले ८८ लाख रुपये

Sambhajinagar News : लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन जय्यत तयारीला लागले आहे. चौथ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया १३ मे रोजी पार पडणार
Lok Sabha Election
Lok Sabha ElectionSaam tv
Published On

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेसाठी अवघे २ दिवस राहिले असून येत्या १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. (sambhajinagar) त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी करण्यात आली असून वाहन व्यवस्था मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. यात (St Bus) एसटी बससाठी ८८ लाख रुपये जिल्हा प्रशासनाने मोजले आहेत. 

Lok Sabha Election
Lightning Strike : वीज पडून महिलेचा मृत्यू, दोनजण जखमी; धडगाव तालुक्यातील घटना

लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) प्रशासन जय्यत तयारीला लागले आहे. चौथ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया १३ मे रोजी पार पडणार असून दरम्यान जिल्ह्यातील २ हजार ४० मतदान केंद्रावर २ हजार ४४५ ईव्हीएम मशीन (EVM) लावल्या जाणार आहे. तर ७ हजार ३४१ बॅलेट युनिट आणि २ हजार ६४३ व्हीव्हीपॅट असणार आहे. या मतदान प्रक्रियेत २० हजार ५०० अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत राहतील. जिल्हा प्रशासनाकडून मतदान केंद्रावरील सुविधा तसेच मशीन नेण्यासाठी करावी लागणारी व्यवस्था यासाठी तयारी करण्यात आली आहे. 

Lok Sabha Election
Marathwada Rain Alert : मराठवाड्यात येलो अलर्ट जारी; वादळी वाऱ्यासह पावसाची वर्तविली शक्यता

ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट, बॅलेट युनिट ने-आण करावी लागणार असल्याने अधिकाऱ्यांसाठी खाजगी व सरकारी वाहने लागणार आहेत. त्यासाठी एकूण १२५५ वाहनाची व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. प्रशासनाकडून बुकिंग करण्यात आलेल्या वाहनांमध्ये जवळपास ३५२ एसटी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. केवळ बससाठी ८८ लाख रुपये महामंडळाला दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com