Marathwada Rain Alert : मराठवाड्यात येलो अलर्ट जारी; वादळी वाऱ्यासह पावसाची वर्तविली शक्यता

Sambhajinagar News : तापमान ४२ अंशाच्या वर पोहचले असून उन्हाचा प्रचंड कडाका जाणवत आहे. परंतु मागील दोन- तीन दिवसांपासून काही भागात अवकाळी पाऊस झाल्याने तापमानात घट झाली आहे
Marathwada Rain Alert
Marathwada Rain AlertSaam tv
Published On

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : मागील दोन आठवड्यापासून मराठवाड्यासह संपूर्ण राज्य उन्हाच्या तडाख्याने (Sambhajinagar) हैराण झाले होते. मात्र हवामान विभागाने आता मराठवाड्यात येलो अलर्ट जाहीर केला असून वादळी वाऱ्यासह पावसाची (Rain) शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

मराठवाड्यासह (Marathwada) राज्यातील अनेक भागात सूर्य  लागला आहे. यामुळे तापमान ४२ अंशाच्या वर पोहचले असून उन्हाचा प्रचंड कडाका जाणवत आहे. परंतु मागील दोन- तीन दिवसांपासून काही भागात अवकाळी पाऊस झाल्याने तापमानात घट झाली आहे. तर आता मराठवाड्यात (Rain Alert) पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाच्या उकाड्यापासून दिलासा मिळणार असला तरी देखील फळबागा आणि पिकांचे नुकसान होण्याच्या शक्यतेमुळे सध्या नागरिक चिंतेत आहे. 

Marathwada Rain Alert
Vasai News : घरफोडी करणारा चोरटा ताब्यात; १२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
Marathwada Rain Alert
Lightning Strike : वीज पडून महिलेचा मृत्यू, दोनजण जखमी; धडगाव तालुक्यातील घटना

आगामी दोन दिवस पावसाची शक्यता 

पुढील दोन दिवस मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या भागांना हा इशारा देण्यात आला. त्यामुळे नागरिकांनी या काळात आपली काळजी घेण्याची आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com