Lightning Strike : वीज पडून महिलेचा मृत्यू, दोनजण जखमी; धडगाव तालुक्यातील घटना

Nandurbar News : झाडावर कोसळल्याने सुशिला या बेशुद्ध झाल्या. तर गुजराबाईला विजेचा झटका लागल्याने त्या जखमी झाल्या
Lightning Strike
Lightning StrikeSaam tv

धडगाव (नंदुरबार) : राज्यात अनेक भागात दोन दिवसांपासून कडकडाटासह अवकाळी पाऊस होत आहे. (Nandurbar) दरम्यान ८ मे रोजी धडगाव तालुक्यातील चांदसैली हिंद आंबापाडा परिसरात वीज पडून एका महिलेचा मृत्यू (Death) झाला आहे. तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. 

Lightning Strike
Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीया निमित्त धुळे, संभाजीनगरसह नंदुबारमध्ये फळांचा राजा आंबा खातोय भाव

धडगाव तालुक्यातील चादसैली हिंद, आंबापाडा येथील सुशीला वन्या वसावे (वय २१) असे मृत महिलेचे नाव आहे. सुशीला वसावे या ८ मी रोजी दुपारी कांतीलाल व त्यांची पत्नी गुजराबाई यांच्यासोबत शेतातील कैऱ्या वेचण्याच्या कामासाठी गेले होते. याच वेळी वादळी वाऱ्यासह पावसाने (Rain) हजेरी लावली. यावेळी तिघेजण झाडाखाली उभे होते. त्यातच झाडावर वीज (Lightning Strike) कोसळल्याने सुशिला या बेशुद्ध झाल्या. तर गुजराबाईला विजेचा झटका लागल्याने त्या जखमी झाल्या. 

Lightning Strike
Vasai News : घरफोडी करणारा चोरटा ताब्यात; १२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

यानंतर तिघांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी सुशिला यांना मृत घोषित केले. तर जखमी गुजराबाई कांतीलाल ऊर्फ कांत्या वसावे (वय २५), कांतीलाल वण्या वसावे (वय ३०, रा. चांदासैली) यांच्यावर उपचार करण्यात आले. याप्रकरणी मोग्या वन्या वसावे यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com