Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीया निमित्त धुळे, संभाजीनगरसह नंदुबारमध्ये फळांचा राजा आंबा खातोय भाव

Mango Price in Dhule, Sambhajinagar: शहरातील विविध भागात पिवळ्या धमक रसाळ आंब्याची दुकाने सजली आहेत. तर दुसरीकडे शहरातील गजानन महाराज मंदिरात आज अक्षय्य तृतीया निमित्त बाराशे हापूस आंब्यांची रास घालून मंदिर परिसर सजवण्यात आलाय.
Dhule, Sambhajinagar, Nandurbar News अक्षय्य तृतीया निमित्त धुळे, संभाजीनगरसह नंदुबारमध्ये फळांचा राजा आंबा खातोय भाव
Huge Demand For Mangoes In Dhule Sambhajinagar Nandurbar On The Occasion Of Akshaya TritiyaSaam Digital
Published On

- भूषण अहिरे, सागर निकवाडे , रामनाथ ढाकणे

अक्षय्य तृतीया हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आंब्याला सर्वाधिक मागणी असते. याच पार्श्वभूमीवर धुळे, नंदुरबार तसेच छत्रपती संभाजीनगर येथे आंब्यांची माेठ्या प्रमाणात आवक झाली आहे. आंबे खरेदीसाठी नागरिकांचा कल दिसून येत असला तरी आंब्यांचे दर मात्र वधारल्याचे चित्र आहे.

Dhule, Sambhajinagar, Nandurbar News अक्षय्य तृतीया निमित्त धुळे, संभाजीनगरसह नंदुबारमध्ये फळांचा राजा आंबा खातोय भाव
Dhule Crime: महिला अधिका-याने कर्मचाऱ्यांकडून घेतली 54 हजार रुपयांची लाच, धुळ्यात एसीबीने पकडले रंगेहाथ

आंब्यासह मडक्यांच्या घागरी खरेदीसाठी धुळ्यात धांदल

खानदेशामध्ये अक्षय्य तृतीया या सणाचे वेगळेच महत्त्व आहे. अक्षय तृतीया सणाच्या पार्श्वभूमीवर आंबा व मडक्याच्या घागरीचे पूजन केले जाते. आज आंबा व मडक्याच्या घागरीला मान दिला जातो. त्यामुळेच मडके आणि आंबा घेण्यासाठी नागरिकांनी धुळ्यातील बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली हाेती. बाजारपेठेमध्ये आंब्याची आवक वाढली असून मडक्यांच्या घागरींची देखील मोठ्या प्रमाणात विक्री हाेत असल्याचे चित्र आहे.

धुळ्यात आंब्याचा दर वधारला

बाजारात मागणी वाढल्यामुळे आंब्याच्या किमती देखील आज वधारल्या असून आज 70 ते 80 रुपये किलो दराने आंबा विक्री केला जात आहे. तसेच मडक्याची घागर देखील 60 ते 70 रुपयांपासून 400 ते 500 रुपयांपर्यंत विकली जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नंदुरबारमध्ये आंब्याची आवक वाढली

नंदुरबार बाजारात मोठ्या प्रमाणात आंबे खरेदीसाठी गर्दी होत आहे. फळ बाजारात मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक पाहायला मिळत आहे. रत्नागिरी हापूस 600 रुपये डझन तर केसर 290 रुपये असा दर आहे. केसर 150 रुपये किलो दराने विकला जात असल्याचे व्यापा-यांनी सांगितले.

Dhule, Sambhajinagar, Nandurbar News अक्षय्य तृतीया निमित्त धुळे, संभाजीनगरसह नंदुबारमध्ये फळांचा राजा आंबा खातोय भाव
Success Story: पारंपारिक शेतीला बगल देत युवा शेतक-याने शेवगा शेतीतून कमविला लाखाेंचा नफा

संभाजीनगरमध्ये 350 क्विंटल आंब्याची आवक

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आंब्याला सर्वाधिक मागणी असते. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये जवळपास 300 ते 350 क्विंटल आंब्याची आवक झाली आहे. सध्या बाजारामध्ये हापूस, केसर आणि लालबाग या आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून विक्री देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

गजानन महाराज मंदिर बाराशे हापूस आंब्यांनी सजविले

यावर्षी सीजन सुरू झाल्यापासून मोठ्या प्रमाणात आंबे विक्रीसाठी दाखल झाले असून शहरातील विविध भागात पिवळ्या धमक रसाळ आंब्याची दुकाने सजली आहेत. तर दुसरीकडे शहरातील गजानन महाराज मंदिरात आज अक्षय तृतीया निमित्त बाराशे हापूस आंब्यांची रास घालून मंदिर परिसर सजवण्यात आलाय.

Edited By : Siddharth Latkar

Dhule, Sambhajinagar, Nandurbar News अक्षय्य तृतीया निमित्त धुळे, संभाजीनगरसह नंदुबारमध्ये फळांचा राजा आंबा खातोय भाव
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, मतदान करा... अन्यथा तुमचेही नाव यादीत येईल, वाचा जिल्हाधिका-यांचा आदेश

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com