माधव सावरगावे, साम टीव्ही
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड येथे भरदिवसा घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसर हादरला आहे. पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या तरुणीचा तिच्याच प्रियकराने गळा चिरून खून केल्याची घटना समोर आली आहे. करमाड येथील गणपती मंदिराशेजारी असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ही थरारक घटना घडली. पूजा सुदाम गावंडे या महिला नेहमीप्रमाणे आपल्या कामात व्यस्त होत्या. त्याच वेळी तिचा प्रियकर सत्यम रावसाहेब गावंडे हा पंपावर आला. दोघांमध्ये काही वेळ वाद झाला आणि संतापाच्या भरात सत्यमने आपल्या जवळील चाकूने पूजाच्या गळ्यावर वार केले.
गंभीर जखमी झालेल्या पूजाचा जागीच मृत्यू झाला. भरदिवसा आणि गर्दीच्या ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. घटनेची माहिती मिळताच करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. प्राथमिक तपासात प्रेमप्रकरणातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, फरार आरोपी सत्यम गावंडेचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत. भरवस्तीत आणि सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या निर्घृण हत्येमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूजा गावंडे यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्यांनी सत्यम गावंडेसोबत दुसरे लग्न केले. दरम्यान आज पूजा गांवडे या नेहमीप्रमाणे पेट्रोल पंपावर काम करत होत्या. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास नराधम सत्यम गावंडे तिथे पोहोचला. दोघांमध्ये काही सेकंड बाचाबाची झाली आणि संतापाच्या भरात सत्यमने जवळ असलेला धारदार चाकू काढून पूजाच्या पाठीत खुपसला.
त्यानंतर ती जमीनीवर कोसळली आणि सत्यमने तिचा गळाही चिरला. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन पुजा यांचा जागीच मृत्यू झाला, भरदिवसा आणि वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे नागरिक हादरून गेले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.