

छत्रपती संभाजीनगरमध्ये एफडीएची मोठी कारवाई
८ हॉटेल्सचे परवाने तात्काळ केले निलंबित
संभाजीनगरमध्ये FDA ची हॉटेल्स आणि कॅन्टीनवर मोठी कारवाई
छत्रपती संभाजीनगर शहरात तुकाराम मुंढे यांच्या एफडीएने मोठी कारवाई केली. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या आणि अन्न सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या बड्या आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकला आणि मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचा अन्नसाठा जप्त केला. एफडीएच्या या धडक कारवाईची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. एफडीएने ८ मोठ्या हॉटेल्सचे परवाने तात्काळ निलंबित केले.
छत्रपती संभाजीनगर शहरासह औद्योगिक परिसरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इंडस्ट्रियल कॅन्टीन्सवर अचानक धाडी टाकून गंभीर त्रुटी आढळलेल्या तब्बल ८ प्रमुख हॉटेल्सचे परवाने अन्न सुरक्षा मानके कायदा, २००६ च्या कलम ३२(३) नुसार तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. तपासणीदरम्यान या ठिकाणी अत्यंत अस्वच्छ वातावरण, उंदीर व किटकांचा प्रादुर्भाव, अन्न चाचणीचा अभाव आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची हेळसांड अशा गंभीर बाबी निदर्शनास आल्या.
हॉटेल कार्निव्हल बार अँड रेस्टॉरंट (बीड बायपास रोड): परिसर व उपकरणांची दुरावस्था, कच्चे व शिजवलेले अन्न एकत्र साठवणे आणि कीटकांचा प्रादुर्भाव आढळला.
मे. हॉटेल निशांत पार्क रेस्टॉरंट (बीड बायपास, मुस्तफाबाद): किचनमध्ये प्रत्यक्ष कीटक व उंदीर आढळले, गंजलेली उपकरणे आणि पूर्वसुधारणा नोटीस बजावूनही नियमांचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न.
M/s MITALI RAJYOG (एमआयडीसी वाळूज, गंगापूर): उपकरणांचे निर्जंतुकीकरण न करणे, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी नसणे आणि एप्रन-हातमोजे न वापरणे.
मे. एफएस सर्व्हिसेस प्रा. लि. / एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजी कॅन्टीन (वाळूज): अस्वच्छ व गर्दीचे किचन, भिंतींचे पापुद्रे व कोळ्यांची जाळी आणि अन्न साठवणुकीसाठी तापमान नियंत्रणाचा अभाव.
राधाकृष्ण गृह उद्योग (शेंद्रा एमआयडीसी): उत्पादनासाठी अयोग्य वेळ व तापमान, कीड प्रतिबंधक उपायांचा अभाव आणि आजारी कर्मचाऱ्यांवर नियंत्रणाचा अभाव.
TABLE 9 GARDEN RESTAURANT (बालापूर, छ. संभाजीनगर): स्टोअरमध्ये अन्नधान्य थेट जमिनीवर ठेवणे, कच्चे व शिजवलेले अन्न तसेच अन्नेतर वस्तू एकत्र साठवून ठेवल्याचे आढळले.
मे. विद्या एन्टरप्राईजेस / एफडीसी कंपनी लि. कॅन्टीन (वाळूज): अन्नाचा संपर्क येणारी उपकरणे गंजलेली, वापरले जाणारे पाणी व तेलाची चाचणी नसणे आणि अस्वच्छ कच्चा माल.
मे. ग्रीन प्युअर व्हेज / GreenPure Veg (वाळूज): कीड नियंत्रणाचा प्रत्यक्ष अभाव, दरवाजे-खिडक्यांना जाळ्या नसणे, होल्डिंग तापमान नियंत्रित नसणे, कच्चे-शिजवलेले व शाकाहारी-मांसाहारी अन्न एकत्र ठेवणे, परवाना दर्शनी भागात नसणे तसेच कर्मचाऱ्यांचे FoSTaC प्रशिक्षण व वैद्यकीय अहवाल गैरहजर असणे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.