E-Sakal: मराठी डिजिटल मीडियात सकाळचेच वर्चस्व! नंबर-1 पोर्टलचा मान
सकाळ मीडियाने ग्रुपने डिजिटल पत्रकारितेतही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आहे आणि याच आघाडीवर देशातील नंबर एक मराठी वेब पोर्टल म्हणून आपले वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. गेल्या काही वर्षापासून डिजिटल युगात विश्वासार्ह आणि वेगवाना बातम्यांसाठी सर्व वाचकांचा पसंती मिळत असून दिवसेंदिवस वाचकांचा या सकाळ मीडिया ग्रुपवर ओढा वाढत आहे.
डिजिटलमध्ये 'सकाळ'चा दबदबा
मराठी मीडिया क्षेत्रातील अग्रगण्य ब्रॅंड म्हणून सकाळने डिजिटल प्लॅटफॉर्मवरही आपली मजबूत कायम ठेवली आहे. विविध प्लॅटफॉर्म्सवर कोट्यवधी वाचकांचा विश्वास संपादन करत, सकाळने वेब आणि मोबाईल(Mobile) अॅप्स शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत विश्वासार्ह आणि उच्च दर्जाच्या बातम्या वेळोवेळी पोहोचवल्या आहेत.
सकाळ मीडिया ग्रुपने पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यात आघाडीच्या प्रसारमाध्यम समूह म्हणून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. न्यूजपेपर असो वा डिजिटल क्षेत्रापर्यंत सकाळने सातत्याने प्रगती केली आहे. ऐवढेच नाही तर सकाळ माध्यम समूहाने डिजिटल पत्रकारितेमध्येही आपली वेगळी ओळख उमटवत तब्बल २५ वर्षांचा यशस्वी प्रवास आतापर्यंत पूर्ण केला आहे.
नंबर-1 पोर्टल बनण्यामागचे कारण
विश्वासार्ह आणि अचूक बातम्या अर्थात वाचकांना योग्य आणि सखोल माहिती पुरवण्याचा सकाळचा प्रयत्न नेहमीच राहिला आहे आणि तंत्रज्ञानाचा (Technology)योग्य वापर म्हणजे सकाळ माध्यम समुहाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत, वेगवान आणि इंटरअॅक्टिव्ह बातम्या सादर केल्या जातात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

