DeepSeek: भारत आयटी तंत्रज्ञानात मागे पडला? इंडियानं डीपसीकसारखं तंत्रज्ञान आणावं का? काय म्हणाले आयटी तज्ज्ञ?

India Should Introduce Technology Like DeepSeek: चीनच्या स्टार्टअपने डीपसीक नावावचं एक चॅटबॉट तयार केलाय. त्यामुळे एआयच्या जगात मोठी खळबळ उडलीय. या क्षेत्रात मक्तेदारी असलेल्या अमेरिकेनेही याची धास्ती घेतलीय. या एआच्या क्षेत्रात भारतानेही उडी घ्यावी का असा सवाल केला जात आहे.
DeepSeek
India Should Introduce Technology Like DeepSeeksaam Tv
Published On

चीनच्या एआय स्टार्टअपच्या DeepSeek ची चर्चा जगभरात होतेय. या कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या जगात मोठी खळबळ उडवून दिलीय. OpenAI चे ChatGPT ला सुद्धा DeepSeek ने मागे सोडलंय. चीनच्या कंपनीने चॅटबॉट DeepSeek-R1 सादर केला आहे. एआयचं हे टूल किती सुपर आहे, त्याचा काय परिणाम होणार, रोजगारावर काय परिणाम होणार? या प्रश्नांची उत्तरे आयटी तज्ज्ञ अतुल कहाते यांनी साम टीव्ही बोलतांना दिली आहेत.

चायनीज एआय चॅटबॉटने गेल्या २४ तासांत जगभरातील बातम्यांमध्ये आपले स्थान निर्माण केलंय. ChatGPT ला मागे टाकून DeepSeek R1 अमेरिकन ऍपल ॲप स्टोअरवर नंबर-1 बनलंय. हे सर्वाधिक डाउनलोड केलेले ॲप बनले आहे. हे अमेरिकेतील Google Play Store मधील शीर्ष रेट केलेले विनामूल्य ॲप देखील बनलंय. चीनच्या या चॅटबॉटमुळे भारताच्या कंपन्यांही मोठा फटका बसलाय. भारतीय एआय कंपन्यांवरही याचा परिणा दिसून आलाय.

DeepSeek
Artificial intelligence : चष्मेबहाद्दरांना मोठी खूशखबर! AI दूर करणार आंधळेपणा, पाहा स्पेशल रिपोर्ट

पण सर्वाधिक मोठा फटका अमेरिकेच्या कंपन्यांना बसलाय. अमेरिकेची या एआय कंपन्यांमध्ये दबदबा होता. आता चीन देखील यात पुढे गेलाय. अशात विकासाच्या वाटेवर असलेल्या भारताने देखील असे तंत्रज्ञान विकसीत करावेत असं म्हटलं जात आहे. का भारत आयटी क्षेत्रात मागे पडलाय का असा सवाल केला जात आहे. गेल्या काही वर्षात भारताने आयटी क्षेत्रात मोठी कामगिरी केली होती. पण एआयमधील ही स्पर्धा पाहता भारत यात मागे पडलाय का असा सवाल केला जात आहे.

DeepSeek
DeepSeek आणून चीनने अमेरिकेची मक्तेदारी मोडली; खोडला 'अमेरिका फर्स्ट'चा दावा

या प्रश्नाला उत्तर देताना आयटी तज्ज्ञ अतुल कहाते म्हणाले, याबाबत दोन मत प्रवाह आहेत. एक म्हणजे, असे तंत्रज्ञान विकसीत केलं पाहिजे. दुसऱ्या प्रवाहानुसार याची आवश्यकता नाहीये. ओपन चॅटजीपीटी आणि डीपसीकसारखे एलएलएम तयार करणं सोप काम नाहीये. माहितीचे साठे असणं आवश्यक असतात. इतक्या मोठ्या माहितीच्या साठ्यात निवडक माहिती तुम्ही शोधू शकतो, तसेच ती माहिती विद्युत वेगाने प्रकाशित करणारं तंत्र तयार करावे लागेल. तसेच ते गुगल सारख सर्च इंजिनसारखं नसावं. माणसाची भाषा ओळखून म्हणजेच एक-एक शब्द ओळखून नव्हे तर माणसाची भाषा ओळखून ती माहिती शोधून देणारं तंत्र असावं.

तसेच कटेंट नव निर्मार्तीचं काम करू शकलं पाहिजे. मग इतकं क्लिष्टपणाचं काम भारतासारख्या देशानं करावं का? इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांनी बाबत प्रतिक्रिया दिलीय. नीलेकणी यांच्यामते, हा खूप क्लिष्ट प्रकार आहे. इतर ठिकाणी याचं काम चालू आहे. भारताने या एलएलएमचा वापर करून सॉफ्टवेअरची निर्मिती कशी करता येईल. म्हणजे त्यावरील अॅप्लिकेशन्स तयार करण्यावर भर दिला पाहिजे.

त्यामुळे मलाही नीलेकणी यांचे मत योग्य वाटते. कारण मूलभूत काम हे झालंय. त्यात चीनने मोठी क्रांती घडवून आणलीय. त्यामुळे इतक्याच स्वस्त आणि जलदगतीने माहिती देणारं सॉफ्टवेअर बनवता आणलं तर यात पडावं, नाहीतर नीलेकणी याचा सूर बरोबर आहे, असं अतुल कहाते म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com