DeepSeek आणून चीनने अमेरिकेची मक्तेदारी मोडली; खोडला 'अमेरिका फर्स्ट'चा दावा

China DeepSeek: यूएस राष्ट्राध्यक्षांना यूएस टेक कंपन्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर वर्चस्व गाजवायचे आहे. परंतु कमी किमतीच्या डीपसीकने आव्हान उभे केले आहे. डीपसीक बाबत सॉफ्टवेअर तज्ज्ञ अतुल कहाते यांनी साम टीव्ही चर्चा केलीय.
DeepSeek
China DeepSeek
Published On

तंत्रज्ञान जगात खळबळ माजून देणाऱ्या डीपसीकने अमेरिकेचं टेन्शन वाढवलंय. या तंत्रज्ञानामुळे अमेरिका फस्टच्या दाव्याची हवादेखील चीनने काढून घेतलीय. DeepSeek हे एक AI चॅटबॉट आहे. चिनी स्टार्टअपने आघाडीच्या यूएस AI प्रणालींशी स्पर्धा सुरू केल्यानं अमेरिकन कंपन्याचं धाबे दणदणाले आहेत. हे चायनीज AI असिस्टंट अमेरिकेच्या OpenAI च्या ChatGPT ला टक्कर देत आहे.

चीनच्या DeepSeek तंत्रज्ञानाकडे जगताचे आता लक्ष लागले आहे. कामगिरीत त्याने ChatGPT, Gemini आणि Claude AI लाही मागे टाकलंय. डीपसीकने अमेरिकन कंपन्यांना मागे सोडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. चिनी स्टार्टअप डीपसीक हे अमेरिकन एआय कंपन्यांसाठी "वेकअप कॉल" आहे. देशांतर्गत उद्योगांना जागतिक प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन मिळालं असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष म्हणालेत.

DeepSeek
DeepSeek: Chat-GPT चं टेन्शन वाढवणारं चीनचं DeepSeek काय आहे? DeepSeek कसा कराल डाउनलोड?

डीपसीकमुळे पुन्हा एका अमेरिका चीन आमनेसामने आलेत. डीपसीकने अमेरिकेचं टेन्शन कसं वाढवलं? त्यांचा अमेरिका फस्टचा दावा कसा मोडीत काढला याबाबत सॉफ्टवेअर तंत्र अतुल कहाते यांनी साम टीव्हीशी बोलतांना माहिती दिलीय. विशेष म्हणजे डीपसीक हे आधीपासून या मार्केटमध्ये होते, परंतु काल परवापासून या चॅटबॉटचा मोठा बोलबाला पाहायला मिळत आहे. त्यामागे कारण म्हणजे, तीन वर्षापूर्वी ओपन एआय कंपनीत मायक्रोसॉफ्ट कंपनीने मोठा निधी दिला होता.

DeepSeek
Corona Virus: विषाणू पसरण्यात चीनच कारणीभूत; प्रयोगशाळेतून लीक झाला होता कोरोना, अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेचा मोठा दावा

त्यानंतर चॅटजीपीटी मार्केटमध्ये आलं. त्याचा उपयोग आपण सर्वजण करतोय. त्याच्या मदतीने आपण सर्व माहिती मिळवत असतो. चॅटजीपीटला आपण कोणताही प्रश्न विचारल तर त्याचं समर्पक उत्तर आपल्याला मिळत असतं. हे आपल्याला फक्त माहिती नाही तर फोटो, व्हिडिओ सुद्धा पुरवत असते. या चॅटजीपीटमध्ये जे तंत्रज्ञान वापरलं जातं, त्याला एलएलपी लार्ज लॅग्वेज मॉडेल अर्थात एलएलएम म्हटलं जातं.

हे एखाद्या व्यक्तीप्रमाणे काम करतं. जर कोणता प्रश्न आपण चॅटजीपीटला केला तर ते आपल्याला समजेल अशा शब्दात उत्तर देत असतं. तांत्रिक भाषेत याला एआयचा पुढचा टप्पा म्हटलं जातं. हे जनेरेटीव्ह एआय म्हटलं जातं. यात फक्त प्रश्नांची उत्तर देणं नाहीये तर त्यापलीकडे इतर कटेंटची निर्मिती सुद्धा यातून केली जाते. जे काही गोष्टी नाही झाल्या आहेत त्याचीही माहिती चॅटजीपीटी देत असतं. उदाहरणार्थ बराक ओबामा यांनी न केलेलं भाषण तयार करायला लावलं तरी आपण एआयमधून मिळवू शकतो.

DeepSeek
TikTok In India: ट्रम्प सरकार भारतात आणणार TikTok? काय आहे इलॉन मस्कचा नवा प्लान

जे सर्व एलएलएम या तंत्रज्ञानामुळे शक्य होतं. एलएलएमचा वापर चॅटजीपीटीमार्फत करत करतोय. याची उपयुक्ता पाहता अनेक कंपन्यांनी हे तंत्रज्ञान विकसित केलेत यात फेसबूकचं लामा, गुगलचं अल्फाबेट असेन. अशा कंपन्यांनी या तंत्रज्ञानाचं जाळ विणलं. परंतु विविध विषयांची माहिती स्टोअर करण्यासाठी स्टोरेज क्षमता अधिक लागते. ज्यावेळी आपण कॉम्प्युटर मध्ये काही डेटा साठवतो तेव्हा कॉम्प्युटरचा सीपीयू ते स्टोरेज करत असते.

परंतु अफाट अशी माहिती स्टोरेज करण्यासाठी कॉम्प्युटरचा सीपीयू हा पुरेसा ठरत नाही. त्यामुळे त्याच सक्षमतेची एक चीप बनवण्यात आली. सीपीयू प्रमाणेच यात स्टोरेज करण्याची क्षमता असते. हे चिप्सला ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट किंवा जिपी युनिट, असं म्हटलं जातं. हे चिप्स तयार करण्याची कंपनीही अमेरिकत आहे, त्याच नाव आहे, एनव्हीडिया. या कंपनीची चीप बनवण्यामध्ये मक्तेदारी आहे. याच चीपच्या जोरावर एआयचं काम केलं जातं. हे काम फक्त अमेरिकत होऊ शकतं असं आता पर्यंत मानलं जात होतं.

कारण काही वर्षापूर्वी अमेरिकेने एआयमधील एकाधिकारशाही टिकावी यासाठी या चिप्सच्या निर्यातीवर निर्बंध मर्यादा घातल्या होत्या. विशेषत: चीनला या चिप्स विकत घेता येऊ नयेत किंवा आयात करता येऊ नयेत. अशा प्रकारचे नियम आणलेत. ही अडथळे पार करत या डीपसीक कंपनीने एक वर्षात एलएलएम तंत्रज्ञानाचा उपयोग करणाऱ्या कंपन्यांना पिछाडलंय. तसेच हे तंत्रज्ञान अल्प खर्चात विकसीत केल्यात. चीनच्या या डीपसीकची क्षमता ही ओपन एआयच्या दर्जाची असल्यानं हा जागतिक धक्का मानलं जात असल्याचं अतुल कहाते म्हणातात.

आघाडीच्या AI मॉडेलपेक्षा खूपच कमी खर्चिक आणि हाय-एंड चिप्सवर प्रशिक्षित आहेत. डीपसीकमुळे एआय टेक कंपन्यांचा गुंतवणुकीतून अब्जावधी डॉलर्सचे परतावे मिळतील याबाबत शंक उपस्थित होत आहे. कारण एनव्हीडियासह अनेक मोठ्या टेक कंपन्यांच्या शेअर्सना फटका बसलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com