
DeepSeek नं अख्या जगात खळबळ माजून दिलीय. एका चिनी स्टार्टअपने विकसित केलेल्या या आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) असिस्टंटने अमेरिकेतील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यां, गुगल, मेटा आणि ओपनएआय यांची झोप उडवून दिलीय. सोशल मीडियावर सोशल मीडियावर DeepSeek - V3 AIमॉडल चं मोठी चर्चा सुरू झालीय. हे अॅप्लिकेशन लॉन्च होताच हे लोकप्रिय झालंय. काही क्षणात एआयटूल चॅटजीपीटीला पिछडत एक नंबरवर विराजमान झालंय.
या डीपसीक येताच याचा परिणाम Nvidia कंपनीच्या शेअर्स १७ टक्क्यांनी खाली कोसळले. डीपसीक हे ओपन-सोर्स असिस्टेंट आहे. हे अॅप्स वापरण्यासाठी उपलब्ध आहे. एका आठवड्यापुर्वी लॉन्च झालेल्या या एआय असिस्टेंटनं अमेरिकेचं टेन्शन वाढवलंय. इंटरनेटवर या अॅप्लिकेशनने खळबळ उडालीय. DeepSeek कसे डाउनलोड आणि वापरू शकता हे जाणून घेऊ.
DeepSeek हा एक AI चॅटबॉट आहे, अमेरिकेच्या OpenAI च्या ChatGPT ला या चायनीज स्टार्टअपने तयार केलेल्या AI असिस्टंट DeepSeek ने थेट स्पर्धा दिली आहे. हे चॅटबॉट चीनच्या Hangzhou येथील एका टेक कंपनीने तयार केलंय. हे शहर चीनच्या आग्नेय भागात वसलेले आहे. कंपनीची स्थापना लियान वेनफेंग यांनी केली होती. DeepSeek हे चर्चेत असण्याचं कारण म्हणजे अमेरिकन कंपन्यांनी विकसित केलेल्या AI असिस्टंट बनवण्यासाठी आलेल्या खर्चाच्या तुलनेत हे खूप कमी खर्चात बनलंय. संशोधकांच्या मते DeepSeek तयार करण्यासाठी फक्त $6 दशलक्ष खर्च आलाय. हे अमेरिकन कंपन्यांनी AI मध्ये गुंतवलेल्या पैशाची नाममात्र रक्कम आहे.
डीपसीकचे - R1 आणि R1 Zero हे दोन मॉडल्स उपलब्ध आहेत. आता युझर्ससाठी R1 मॉडल उपलब्ध आहे. डीपसीककडे वापरकर्त्यांचे लक्ष वेधून घेणारी आणखी एक खास गोष्ट म्हणजे हा एआय असिस्टंट सध्या वापरण्यास पूर्णपणे विनामूल्य आहे. म्हणजे काहीच पैसे खर्च न करता या चॅटबॉटमध्ये प्रवेश करत आपण ते वापरू शकतो. इतर AI टूल्सच्या तुलनेत हे विनामूल्य आहे आणि तेही अमर्यादितपणे वापरता येत आहे.
DeepSeek वापरण्यासाठी ते तुम्हाला तुमच्या iPhone वर डाउनलोड करावे लागेल. ते तुम्ही वेबवरहून मिळू शकतात.
डाउनलोड करण्यासाठी, प्रथम App Store वर जा.
यानंतर सर्च बारमध्ये DeepSeek टाईप करा.
त्यानंतर स्क्रीनवर ॲप दिसेल तेव्हा Get बटणावर क्लिक करा
प्रथम तुमच्या ब्राउझरमध्ये chat.deepseek.com टाइप करा.
यानंतर तुम्ही लॉगइन करण्यास विचारलं जाईल. त्यात तुम्ही गुगल आयटी आणि पासवर्ड टाका, त्यानंतर ते लॉगइन करू शकतात.
DeepSeek चा इंटरफेस देखील ChatGPT सारखा दिसतो, तुम्हाला फक्त संवाद बॉक्समध्ये तुमचा प्रश्न टाईप करावा लागेल. नंतर AI-चॅटबॉटच्या उत्तराची प्रतीक्षा करावी लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.