TikTok In India: ट्रम्प सरकार भारतात आणणार TikTok? काय आहे इलॉन मस्कचा नवा प्लान

Elon Musk Plan For TikTok : Oracle कंपनी चीनच्या ByteDance कडून TikTok खरेदी करण्यात आघाडीवर आहे. TikTok मध्ये ओरॅकल कंपनीची भागीदारी आहे. याशिवाय इलॉन मस्कनेही टिकटॉकमध्ये आपली रुची दाखवलीय.
TikTok In India
Elon Musk Plan For TikTok
Published On

भारतातील इंटरनेट युझर्स आणि सोशल मीडिया क्रिएटर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. भारता पुन्हा एकादा टिक टॉक सुरू होण्याची शक्यता आहे. भारताने चिनी अॅप असलेल्या टिकटॉकला बंदी घातलीय. अमेरिकेतही या अॅपला बंदी घालण्यात आली होती मात्र आता अमेरिकेत आलेल्या ट्रम्प सरकारने चीनी कंपनीला ७५ दिलासा देत बंदीबाबत तुर्तास स्थगिती आणलीय. यूएस कोर्टाने टिकटॉकवर बंदी घातली.

पण डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनताच कार्यकारी आदेशाद्वारे टिकटॉकला बंदीतून ७५ दिवसांची सूट देण्यात आलीय. त्यामुळे ट्रम्प TikTok बाबत मोठा निर्णय घेऊ शकतात. यात एलॉन मस्कसह इतर अनेक बडे अमेरिकन उद्योगपती टिक टॉक खरेदी करून ट्रम्प सरकारला मदत करू शकतात.

TikTok In India
Maruti Suzuki cars : महागाईचा ग्राहकांना मोठा धक्का, मध्यमवर्गीयांना परवडणारी कार महागली; मारुती सुझुकीच्या दरात भरघोस वाढ

हेरगिरीच्या आरोपानंतर अमेरिकन कोर्टाने टिकटॉकवर बंदी घातली होती. भारतातही टिकटॉकवर असाच आरोप करण्यात आलाय. त्यानंतर जून २०२० मध्ये सरकारने भारतात टिकटॉकवर बंदी घालण्यात आली होती. पण जर टिकटॉकचा मालकी हक्क अमेरिकेचा झाला तर ते अॅप भारतात परत सुरू होऊ शकते असा अंदाज लावला जात आहे.

TikTok In India
WhatsApp Update: व्हॉट्सॲपचे धासू फीचर, आता एकाच फोनमध्ये उघडता येणार अनेक अकांऊट

या गोष्टींमुळे वर्तवला जातोय अंदाज

सध्या TikTok मध्ये चीनी आणि अमेरिकन अशा दोन्ही कंपन्यांची भागीदारी आहे. ज्यामध्ये चीनची ByteDance आणि अमेरिकेची Oracle कंपनी आहे. तर टिकटॉकमध्ये अमेरिकेची ५० टक्के भागीदारी असावी आणि त्यासह सॉफ्टवेअर अपडेट आणि डेटा सेंटरही अमेरिकेत असावं, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणालते. यावर विचारविनिमय करण्यासाठी ट्रम्प यांनी ७५ दिवसांचा पर्याय ठेवलाय. यात अमेरिकन कंपनी बाइटडान्सकडून आपला हिस्सा खरेदी करू शकते असं सांगितलं जात आहे.

TikTok कोण खरेदी करू शकेल?

चिनीची कंपनी ByteDance बाइट डान्सकडून अमेरिकेची Oracle कंपनी टिकटॉक खरेदी करू शकते. या कंपनीचं नाव आघाडीवर आहे, त्यामागील कारण असं की, TikTok मध्ये या कंपनीची आधीच भागीदारी आहे. इतकेच नाहीतर एलॉन मस्क यांनी टिक टॉकमध्ये आपली रस दाखवलाय.

TikTok खरेदी करण्याच्या शर्यतीत इतर कंपन्यादेखील आहेत. यात अब्जाधीश फ्रँक मॅककोर्ट आणि YouTube स्टार जिमी डोनाल्डसन यांच्या नेतृत्वाखालील गुंतवणूकदारांचा गटाचाही यात समावेश आहे. यांना मिस्टर बीस्ट म्हणून ओळखले जातं.

TikTok चे भारतात पुनरागमन होण्याची शक्यता?

अमेरिकेला टिकटॉकवर पूर्ण नियंत्रण मिळाल्यास टिकटॉकची भारताती एन्ट्री होऊ शकते. मात्र यासाठी टिकटॉकला भारतीय कायद्यांचे पालन करावे लागेल. सध्या देशात फेसबुक, इंस्टाग्राम, थ्रेड, व्हॉट्सॲप आणि एक्स सारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. हे सर्व अॅप्स भारतीय कायद्यांचे पालन करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com