चाकणकरांकडून नाव,फोटो, शैलीचा ट्रेडमार्क; परवानगीशिवाय नाव, फोटो वापरल्यास कारवाई

Rupali Chakankar Faces Opposition Backlash: राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. स्वत:चे नाव, ओळख, फोटो, वैयक्तिक शैलीची त्यांनी ट्रेडमार्क नोंदणी केली आहे. त्यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर हल्लाबोल केलाय. चाकणकरांनी नेमकी काय पोस्ट केली आहे ? त्यावर कसे पडसाद उमटलेत? पाहूया एक खास रिपोर्ट..
RUPALI CHAKANKAR TRADEMARK ROW
RUPALI CHAKANKAR TRADEMARK ROWsaam tv
Published On: 

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात वादात सापडलेल्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. कारण त्यांनी स्वतःचे नाव, फोटो, व्हिडीओ, ओळख आणि वैयक्तिक शैलीची ट्रेडमार्क नोंदणी केली आहे.. त्यांनी स्वत: पोस्ट करत ही माहिती दिली आहे. पूर्वपरवानगीशिवाय कोणीही याचा व्यावसायिक तसंच वैयक्तिक फायद्यासाठी वापर करू नये, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे... रुपाली चाकणकरांनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटलंय....पाहुयात

मात्र चाकणकऱ्यांच्या या ट्रेडमार्कवरुन विरोधकांनी हल्लाबोल केलाय. खरात प्रकरणात कुणी बोलू नये म्हणून चाकणकर धमक्या देत असल्याचं रुपाली ठोंबरे पाटलांनी म्हटलंय.. तसेच गुलाबो गँगच्या संगीता तिवारी यांनीही त्यांच्यावर टीका केलीये.

महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स' हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आधारित असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटात अभिनेत्री आणि नेत्या दीपाली सय्यद या रुपाली चाकणकर यांच्याशी मिळतीजुळती भूमिका साकारत आहेत. महाराष्ट्र इपस्टीन फाइल्स हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून रूपाली चाकणकर सेन्सर बोर्डात गेल्यात. दरम्यान आमचा सिनेमा पूर्ण काल्पनिक आहे. चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून रुपाली चाकणकर दबाव टाकत असल्याचा आरोप दिग्दर्शकाकडून करण्यात येतोय..

अशोक खरात प्रकरणात चौफेर टीकेनंतर चाकणकरांना माहिला आयोग आणि महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. चित्रपट काल्पनिक असला तरी त्यानिमित्त भोंदूबाबा खरातचे काळे कारनामे पुन्हा जनतेसमोर येणार आहेत. मात्र चाकणकरांच्या ट्रे़डमार्क नोंदणीमुळे सिनेमा प्रदर्शित होण्यात अडथळे येणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.